Crime Sakal
अहिल्यानगर

तरुणीचे अपहरण करून केला अत्याचार; तिघांवर गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

राहुरी (जि. नगर) : मुलीच्या वडिलांनी लग्नाला नकार दिल्याच्या रागातून दोन तरुणांनी अठरा वर्षांच्या मुलीचे अपहरण केले.‌ तिला दीड महिना कोंडून ठेवले. दरम्यान, तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करून मारहाण केली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एका आरोपीला अटक केली असून, दोन जण पसार आहेत.

रवींद्र शंकर बर्डे (रा. गोरेगाव, ता. पारनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा सहकारी अनिल (पूर्ण नाव समजले नाही) व बर्डेची नातेवाईक महिला अद्याप पसार आहेत. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की चेडगाव (ता. राहुरी) येथे घराजवळील ओढ्याने जात असताना आरोपींनी तोंड दाबून दुचाकीवरून अपहरण केले. केडगाव (ता. नगर) येथे १९ जून ते २४ जुलैदरम्यान एका घराच्या खोलीत डांबून ठेवले. वडिलांनी आरोपीबरोबर लग्न लावून देण्यास नकार दिल्याच्या रागातून वेळोवेळी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून, अत्याचार केले.

काल (गुरुवारी) गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मुख्य आरोपीस तत्काळ अटक केली. पसार आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव करीत आहेत.

(case has been registered against three persons for abducting and abusing young girl)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT