kothewadi
kothewadi  esakal
अहमदनगर

कोठेवाडीची 'ती' काळरात्र..आजही नागरिक दहशतीखाली, CCTV ची नजर

राजेंद्र सावंत

पाथर्डी (जि.अहमदनगर) : कोठेवाडीतील ती काळरात्र आठवली की मन सुन्न होतं. वीस वर्षांनंतरही तो प्रसंग आठवला की अंगाला कापरे भरते. कोणी आपल्यावर सूड उगवायला येईल का, अशी अनामिक भीती कायम मनात असते. आजही ‘भय इथले संपत नाही’ अशी अवस्था कोठेवाडीकरांची आहे. गावात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे. चार सशस्त्र पोलिसांचा पहारा गावात चोवीस तास सुरू आहे. या पहाऱ्याच्या जोडीला आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची राहणार नजर

महिलांचे आत्मबळ वाढविण्यासाठी शिवसेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलिस, महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन महिला व ग्रामस्थांना धीर देण्याचे काम केले आहे. कोठेवाडी हे चितळवाडी ग्रामपंचायतीअंतर्गत येणारे छोटे गाव. ऊसतोडणी हा मुख्य व्यवसाय असणारे पूर्वीचे हे गाव आता शेतीकडे वळलेय. कोठेवाडीत १७ जानेवारी २००१ रोजी मध्यरात्री दरोडा पडला. बारा ते पंधरा नराधमांनी पैसे, दागदागिने लुटत महिलांवर सामुहिक अत्याचार केले. राज्यभर गाजलेल्या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही, हीच गोष्ट येथील महिलांच्या मनात कायम घर करून आहे. या प्रकरणातील काही जण आता तुरुंगातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांचा रोज पहारा असूनही, अंधार पडला की काळजात धस्स होते, असे येथील महिलांमधून बोलले जात आहे.

कोठेवाडीतील बंद पडलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. दोन दिवसांत ते पूर्ण होईल. पोलिस अधिकारी व कर्मचारी कोठेवाडीच्या परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहेत. मी कोठेवाडीत एक दिवसाआड जातोय. परिस्थिती शांततेत आहे. महिला व पुरुषांनी काळजी करू नये. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. - सुहास चव्हाण, पोलिस निरीक्षक, पाथर्डी

कोठेवाडीतील ग्रामस्थ भयभीत आहेत. पोलिसांचा व नीलम गोऱ्हे यांचा आधार आहे. आता युवकही चांगले संघटित आहेत. तरीही काही ज्येष्ठ नागरिक भीतीच्या सावटाखाली राहतात. सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले होते, ते दुरुस्त करण्यात येत आहेत. सरकारने येथे पोलिस चौकी मंजूर करावी, - गोरक्ष कोठे, नागरिक, कोठेवाडी, ता. पाथर्डी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT