chief accountant of ahmednagar municipal corporation arrested for soliciting bribe
chief accountant of ahmednagar municipal corporation arrested for soliciting bribe sakal
अहमदनगर

‘मनपा’चा मुख्य लेखाधिकारी ‘लाचलुचपत’च्या सापळ्यात

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : अहमदनगर महापालिकेत मुख्य लेखाधिकारी प्रवीण गोपाळराव मानकर यांना ठेकेदाराच्या कामाचा धनादेश काढण्यासाठी २० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने आज अटक केली. एका ठेकेदाराला महापालिकेत केलेल्या कामाची बिले मंजूर करून धनादेश देण्याच्या मोबदल्यात आरोपी मुख्य लेखाधिकारी प्रवीण गोपाळराव मानकर (वय ५२, रा. दिल्ली गेट, मानकर गल्ली, नगर. हल्ली रा. उत्तम टाऊनस्केप, विश्रांतवाडी, पुणे) यांनी संबंधित ठेकेदाराकडे २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

तक्रारदार ठेकेदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ता. ७ ऑक्‍टोबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून त्याच दिवशी केलेल्या लाच मागणी पडताळणी करण्यात आली. प्रवीण मानकर यांनी तक्रारदार यांच्याकडे २० हजार रुपयांची मागणी केली. त्याच दिवशी १५ हजार रुपये स्वीकारण्याची संमती दर्शवली. पंचासमक्ष हे बोलणे झाले होते. त्यामुळे आज (बुधवारी) त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पुष्पा निमसे यांनी ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT