shevgaon 
अहिल्यानगर

शेवगावमध्ये तळे साचल्यामुळे शहरवासियांना करावा लागतोय डास व दुर्गंधीचा सामना

सचिन सातपुते

शेवगाव (नगर) :  शहरातील ओढया नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह जागोजागी बंद केल्याने पावसाचे पाणी जाण्यास वाव नसल्याने शहरात विविध प्रभागात तळे साचून डास व दुर्गंधीचा सामना शहरातील नागरीकांना करावा लागत आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे पाणी जाण्यास व निचरा होण्यास पर्याय उपलब्ध नसल्याने नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शेवगाव शहरासह परिसरात गेल्या काही दिवसापासून संततधार पाऊस सुरु आहे. शहरातील अनेक भागात जागा रहिवाशी करण्यासाठी ओढया नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह बंद करुन त्यावर पक्के बांधकामे करण्यात आलेले आहेत. ब-याच ठिकाणी रस्त्याचा भराव टाकतांना प्रवाह बंद करुन टाकले आहेत. त्यामुळे थोडयाशा पावसाने सुध्दा पाणी वाहण्यास अडचणी येतात. बांधकामाशेजारी उरलेल्या रिकाम्या प्लाँटमध्ये पाणी साचते. त्याचा फटका परिसरातील रहिवाशी नागरीकांना बसतो. पाणी वाहून जाण्यास व जिरण्यास वाव नसल्याने पाणी साचून ते सडते, त्याची दुर्गंधी सुटून त्यावर डासांचा प्रादुर्भाव होतो.

गेल्या काही दिवसापासून सतत पाऊस सुरु असल्याने शहर व उपनगरातील अनेक रिकाम्या प्लाँटमध्ये असे डबके तयार झाले असून डासांमुळे परिसरातील नागरीक त्रस्त झाले आहेत. उपनगरातील अनेक प्रभागात पक्के रस्ते नाहीत. त्यामुळे अंतर्गत रस्तेही चिखलाने माखले आहेत. त्यामुळे अशा रस्त्याने ये जा करतांना शहरात राहतो की एखादया खेडेगावात राहतो, असा प्रश्न पडतो. उपनगरातील नागरीकांना नगरपरीषदेकडून कुठल्याच सोयीसुविधा मिळत नसल्याने कर आकारण्यासाठीच नगरपरीषद आहे काय? असा प्रश्न नागरीक उपस्थित करत आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आरोग्य विषयक तक्रारींनी शहरातील नागरीक आधीच ग्रासलेले असतांना या दुर्गंधीयुक्त पाण्याची त्यात भर पडली आहे. आजुबाजूला रहिवाशी निवासस्थाने असल्याने नागरीक एकमेकांच्या घराकडे पाणी जावून देण्यास विरोध करतात. त्यामुळे जास्त पाऊस आल्यास अनेकदा नागरीकांच्या घरात पाणी शिरण्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत नगरपरिषदेकडून कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्याने नागरीकांना त्याचा मनस्ताप  सहन करावा लागत आहे. 

दिपक झाडे म्हणाले, मिरी रस्त्यावरील माऊली नगर परीसरात साचलेले पाणी जाण्यास वाव नसल्याने ते थेट घरात शिरु लागले आहे. याबाबत या परीसरातील नगरसेवक व नगरपरीषदेकडे तक्रार करुनही फारसा उपयोग होत नाही.
                                                                                                           
संपादन - सुस्मिता वडतिले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT