

Alliance Under Strain Over Seat Allocation in KDMC Elections
esakal
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली: महापालिका निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असतानाही ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. विशेषतः कल्याण-डोंबिवलीत भाजपकडून करण्यात आलेल्या ७३ जागांच्या ठाम मागणीमुळे युतीतील वातावरण तापले आहे. प्रभागात कुणाला उमेदवारी मिळणार आणि कुणाची राजकीय वाटचाल थांबणार, याबाबत स्पष्टता नसल्याने युतीतील पक्षांमध्ये तसेच इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. जागावाटपावरून सुरू असलेली ही रस्सीखेच आता थेट वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर चर्चेपर्यंत पोहोचली असून, युतीतील पक्षांमध्ये तसेच इच्छुक उमेदवारांमध्येही अस्वस्थता वाढत चालली आहे.