corona 19 p
corona 19 p 
अहमदनगर

विदेशात अडकलेल्या नागरिकांची घरवापसी होणार 

सकाळ वृत्तसेवा

नगर : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात नोकरी, शिक्षण, व्यवसाय आदी कारणांसाठी परदेशात अडकलेल्या नागरिकांची घरवापसी सुरू होणार आहे. यासाठी केंद्रीय गृहखात्याने आदर्श कार्यपद्धती निश्‍चित केली आहे. त्यानुसार विदेशातून जिल्ह्यात येऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी समन्वयक अधिकारी म्हणून महापालिका उपायुक्त सुनील पवार यांना नियुक्त केले आहे. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी यासंदर्भातील आदेश काल (गुरूवारी) जारी केले. 

लॉकडाउनमुळे नगर जिल्ह्यातील अनेक नागरिक विदेशात अडकलेले आहेत. त्यांना नगर जिल्ह्यात परत आणावे अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्याकडे केली होती. यात विद्यार्थ्यांची व नोकरी निमित्त विदेशात गेलेल्या भारतीय नागरिकांची संख्या जास्त आहे. या नागरिकांचे कुटुंबीय सध्या चिंतेत आहेत. विदेशातील हे नागरिक परत यावेत यासाठी या कुटुंबीयांनी विदेश मंत्रालयाशीही पत्र व्यवहार केला होता. पंतप्रधान कार्यालयाकडून या नागरिकांना परत भारतात आणण्यासाठीची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यासाठी एक मोहीम आखण्यात येत आहे. 17 मे पासून या मोहिमेला सुरवात होईल असे सूत्रांकडून समजते. त्यादृष्टीने प्रत्येक जिल्हा प्रशासनाने विदेशात अडकलेल्या नागरिकांची माहिती गोळा करून केंद्र सरकारला पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

23 मार्चला लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर हवाई, रेल्वे, रस्ते वाहतुकीची साधने पूर्णतः ठप्प झाली. त्यामुळे नोकरी, शिक्षण, उद्योग, व्यवसाय व तसेच पर्यटनानिमित्त विदेशात बहुतांश नागरिक अडकले. त्यानुसार विदेशात अडकलेल्या नागरिकांशी समन्वय साधून आदर्श पद्धतीने कार्यवाही करण्यासाठी महापालिका उपायुक्त पवार यांची नियुक्ती करण्यात आली. 


विदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी महापालिका येथे कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. विदेशातून येणाऱ्या नागरिकांची सरकार दोन दिवस आधीच पूर्वसूचना देणार आहे. त्यानंतर विदेशी नागरिकांना त्यांच्याच पैशातून 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. 
-सुनील पवार, महापालिका उपायुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT