Commencement of road work in Deswade in Parner taluka 
अहिल्यानगर

दाते यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात भरीव निधी : रामदास भोसले

सनी सोनवाळे

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : पारनेर तालुक्यात जिल्हा परिषद मार्फत कृषी व बांधकाम समितीच्या माध्यमातून विविध योजनेतुन कृषी योजना, रस्ता, पुल यासह अन्य विकासकामांसाठी भरीव निधी सभापती काशिनाथ दाते यांच्या माध्यमातून तालुक्यात आला, असे प्रतिपादन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांनी केले.

देसवडे (ता. पारनेर) काळेवाडी ते बोरमळी या घाट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ भोसले यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. सभापती काशिनाथ दाते, उपसरपंच बबन शिंदे, भाऊसाहेब टेकुडे, शिवाजी दाते, प्रा. किशोर टेकुडे, संपत तोडकर, शिवाजी गुंड, बबन गुंड उपस्थित होते.

दाते म्हणाले, काळेवाडी येथील ग्रामस्थांची हा घाट रस्ता करण्याची मागणी केली होती. त्यानुसार हा रस्ता पाहिल्यानंतर हा रस्ता डोंगरपोटांनी खाली बोरमळी येथे टेकडवाडीला जाणाऱ्या डांबरी रस्त्यास जोडणे आवश्यक होता. येथील शेतकऱ्यांच्या पाईपलाईन नदीवरून वरती घाटाने गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना शेतीकामासाठी सारखे खाली घाटाने उतरावे लागत होते. अतिशय खडतर घाटाने महिला व लहान मुले खाली उतरतात. हे पाहून जिल्हा परिषदेच्या निधीची तरतूद करून हा रस्ता करून देण्याचे ठरवले व आज प्रत्यक्ष कामास सुरवात करण्यात आली.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

आजचे राशिभविष्य - 17 सप्टेंबर 2026

Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

SCROLL FOR NEXT