क्राईम स्टोरी 
अहिल्यानगर

नेवाशात घडली अपहरणाची "पिक्चर स्टाइल" घटना, पोलिसही चक्रावले

प्रा. सुनील गर्जे

नेवासे : नेवासे पोलिसांत एका तरुणाच्या अपहरणाची तक्रार दाखल होते. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पोलिस तपास सुरू होते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट. इतकेच नाही, तर कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून राखीव दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. पोलिसांचा चोवीस तासांचा ‘मॅरेथॉन’ तपास सुरू होतो.

चित्रपटात शोभेल अशी घटना सोमवारी (ता. सात) सायंकाळी घडली. त्याचे झाले असे ः सागर विलास शिंदे (रा. सावतानगर, नेवासे) यांनी नेवासे पोलिसांत, सोमवारी आपला भाऊ गणेश शिंदे हा मावस बहिणीला आणण्यासाठी तालुक्यातीलच खामगाव येते जात असताना त्याचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. पोलिस निरीक्षक विजय करे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून याबाबत वरिष्ठांना माहिती देत तपास सुरू केला. (Complaint of abduction of youth in Nevasa)

दरम्यान, तपासात पोलिसांना गेवराई- पिंप्री शहाली (ता. नेवासे) रस्त्यावर असलेल्या पाटचारीच्या कडेला गणेशची दुचाकी आढळली. पोलिसांनी परिसरातील लोकांकडे विचारपूस केली असता, सोमवारी या दुचाकीच्या जोराच्या धडकेने एक महिला बेशुद्ध पडली. त्यानंतर नागरिकांनी दुचाकीस्वारास मारहाण करून त्याचा मोबाईल व दुचाकी हिसकावून घेतल्याचा प्रकार समोर आला.

या प्रकारानंतर संबंधित व्यक्ती पायी निघून गेल्याचेही नागरिकांनी सांगितले. दरम्यान, ही व्यक्ती गणेश शिंदेच होती हे निष्पन्न झाले. मात्र, त्याचा कुठेच शोध लागत नसल्याने, पोलिसांच्या मनात वेगवेगळ्या शंका वाढल्या. त्यांनी कायदा- सुव्यवस्थेच्या दृष्टीने नगरहून राखीव पोलिस दलाची तुकडी बोलाविली. शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नेवासे पोलिसांची तीन पथके याप्रकरणी तपास करीत होती. मात्र. त्यांना गणेशचा शोध लागेना.

दरम्यान, आज सायंकाळी चारच्या दरम्यान गणेशच्या नेवाशातील एका मित्राला मोबाईल वरून कॉल आला. त्या मित्राने याबाबत पोलिसांना माहिती दिल्यावर त्यांनी तांत्रिकदृष्ट्या तपासावरून गणेशला भिंगार येथून ताब्यात घेतले.

गणेशकडे विचारणा केली असता, ‘अपघात झाल्याने आपण भीतीपोटी घटनास्थळावरून पायी कुकाण्याला व तेथून वाहनाने शेवगावमार्गे नगरला जाणार होतो, असे सांगितले.

यात अपहरणासारखा गुन्हा दाखल होता. त्यातून जीवितहानी होऊ नये, यासाठी वेगाने तपास करणे महत्त्वाचे होते. मात्र, हा प्रकार अपघातातून भीतीपोटी घडल्याचे उघड झाले.

- विजय करे, पोलिस निरीक्षक, नेवासे(Complaint of abduction of youth in Nevasa)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ; 12 लाख कर्मचाऱ्यांना फायदा

हार्दिक पांड्या SRH कडून खेळणार? इंस्टा स्टोरी अन् चर्चेला उधाण; Mumbai Indians देखील फिटनेसबाबत काहीच सांगेना

Viral IPL Broadcast Trend: Gemini AI चा भन्नाट ट्रेंड! स्वतःचा फोटो अपलोड करा आणि काही सेकंदांत बना IPL Broadcast मधला Fan

एडिटरच्या बायकोला ३ डझन बांगड्या! संजू राठोडच्या 'लाल कलरची बांगडी'वर अशोक सराफ यांचा डान्स, व्हिडिओ वायरल

Latest Marathi News Live Update : अमरावतीत हनी ट्रॅप; शेतकऱ्याकडून उकळले तब्बल 69 लाख

SCROLL FOR NEXT