राहाता ः कोविड रूग्णालयात घड्याळातील काटा मध्यरात्र झाल्याचे दाखवतोय. कुणाला अचानक धाप लागलीय. कुणी उभे रहाताच खाली कोसळलेय. रूग्णशय्येवर पडलेल्या पतीचे हाल पाहून रडणा-या पत्नीला धीर देण्यासाठी मेहुणा जोखीम पत्करून आत आलाय.
शेवटच्या घटका मोजणा-या वृध्दाला पहायला आठ दिवस झाले कुणी आलेले नाही. पीपीई किट घालून मृत्यूच्या दाढेतून रूग्णांना बाहेर काढण्यासाठी आटापिटा करणारे शहरातील डाॅ. विनयानंद पाटील यांनी आपले अंगावर शहारे आणणारे अनुभव सांगत होते.
तब्येत खालावल्याने शहरातील उद्योजक संदीप सांड यांना नाशिक येथील रूग्णालयातून हेलिकॅप्टरने पुण्याला हलविण्याचा निर्णय झाला. हेलिकॅप्टर आकाशात झेपावण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तेथेच उपचार घेणारे त्यांचे वडील रमेश सांड देवाघरी गेले. हे त्यांना कळवले नव्हते.
कोविडच्या हल्ल्यातून धाकटा भाऊ कसाबसा बचाववला. कुटूंबातील दोन माणसे एकापाठोपाठ एक तडकाफडकी निघून गेली. आज सामाजिक कार्यकर्ते सोपान मुर्तडक यांचा रूग्णालयात मृत्यु झाला. त्यापूर्वी त्यांच्या मातोश्री व बहिणीला कोविडने हिरावून नेले. आर्किटेक्चर मनोज महाले ध्यानीमनी नसताना गेले.
पूर्वी शहरातील चौका चौकात अभिष्टचिंतन आणि अभिनंदनाचे फलक लागायचे. आता बंद दुकाने आणि श्रध्दांजलीचे फलक मनात धडकी भरवित आहेत. आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल वेळेवर मिळत नाहीत.
अहवालाशिवाय रूग्णालयात प्रवेश नाही. अहवाल मिळाला तर बेड नाही. बेड मिळाली तर रेमडेसिवीर नाही. तब्येत बिघडली तर व्हेंटीलेटरची शाश्वती नाही. सारे काही जमून आले तर पैशाची जुळवाजूळव होत नाही. पैसे आहेत त्यांनाही मृत्यू टाळता आला नाही. कोविड क्रुर आहे तरीही विना मास्क फिरणे मृत्यूला आमंत्रण आहे अनेकांच्या लक्षात येत नाही.
संपादन - अशोक निंबाळकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.