Corona positive to a mentally ill young man in Nevasa 
अहिल्यानगर

हॉस्पिटलमधून पळालेला तो मनोरूग्ण निघाला पॉझिटिव्ह, कोणाकोणाच्या आला संपर्कात

सुनील गर्जे

नेवासे  : कोरोनाग्रस्त आजीच्या संपर्कात आल्याने घशातील स्राव नमुने घेण्यासाठी दाखल केल्यावर जिल्ह्य रुग्णालयातून पळालेल्या नातवाला प्रशासनाने शिताफिने पकडले. दोन दिवसांनी घोडेगाव येथे सापडलेला  'तो' नातू कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. पलायन केल्यानंतर हा पॉझिटिव्ह मनोरुग्ण दोन दिवसांत कोणाकोणाच्या संपर्कात आला, याचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली आहे. मात्र, ती मोठी डोकेदुखी ठरते आहे. दरम्यान, या अहवालामुळे नेवासे बुद्रुक ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कल्याणहून नेवासे बुद्रुक येथील आपल्या मुलीला भेटायला आलेल्या साठवर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली होती. तिच्या संपर्कात आलेला जावई व नातवासहसह एकूण सात जणांना तालुका प्रशासनाने घशातली स्राव नमुने घेण्यासाठी नगर येथे जिल्हा रुग्णालयात रविवारी (ता. २४) रोजी सायंकाळी दाखल केले होते. मात्र, सोमवारी सकाळी हे पिता-पुत्र घशातील स्रव नमुने न देताच जिल्हा रुग्णायातून पळाले. वडील थेट नेवासे बुद्रुक गावात आल्याने त्याला त्याच दिवशी आरोग्य विभागाने ताब्यात घेऊन नेवासे फाटा परिसरातील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात असलेल्या विलगिकरण कक्षात दाखल केले. 

मनोरुग्ण असलेल्या पंचवीस वर्षीय मुलाला मंगळवारी (ता. २६) रोजी सोनई पोलीस ठाण्याचे सहाययक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना मिळालेल्या माहितीवरून घोडेगाव येथेच रस्त्यावर आढळला. पोलिसांनी त्याला घोडेगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष ईश्वरे यांनी त्या तरुणांची  तापासणी करून त्याला ताब्यात घेतले. मंगळवारीच त्याच्या घशातील स्राव नमुने पुण्याला पाठवले होते. आज आलेल्या अहवालात तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

कोरोना पॉझिटिव्ह आजी नेवासे बुद्रुक शाळेत विलागीकरण कक्षात असतांना तीच्या संपर्कात हा तरुण नेहमीच असायचा यामुळे तो पॉझिटिव्ह असण्याची  शक्यता आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती ती अहवाल आल्याने खरी निघाली.  

प्रशासनाला तपास आव्हानात्मकच 

कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये या दृष्टीने पॉझिटिव्ह निघालेला हा तरुण जिल्हा रुग्णालयातून पलायन केल्यावर तो कुठे-कुठे,  कसा, कोणकोणत्या वाहनांतून कोणकोणाच्या संपर्कात आला. हा त्याच्या पलायन इतिहासाचा शोध घेणे  अतिमहत्वाचे आहे. मात्र, मनोरुग्णाकडून ही सर्व माहिती घेणे प्रशासनाला आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळे तो ज्या-ज्या नातेवाईकांकडे गेला, त्या नातेवाईकांनी तरी स्राव नमुने तपासणीसाठी स्वतः होऊन पुढे येणे समाजहिताच्या दृष्टीने महत्वाचे आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : शिवसेना शिंदेंचीच अन् राष्ट्रवादी अजितदादांची! सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर CM फडणवीसांचे भाकीत; राजकीय वर्तुळात चर्चा

IND vs SL 1st Test : बुमराहची अनुपस्थितीत, दोन गोलंदाजांपैकी निवडू कोणाला? शुभमन गिल पहिल्या सामन्यापूर्वी पेचात अडकला, म्हणाला...

Maruti Suzuki Offer: ऑगस्टमध्ये कार खरेदीची मोठी संधी! तब्बल 1.85 लाखांपर्यंत फायदा; Grand Vitara, Balenoसह कोणत्या कारवर किती ऑफर?

अमिताभ बच्चन यांच्या ‘जुम्मा चुम्मा दे दे’ गाण्याने रातोरात स्टार झाली, कुटुंबासाठी सोडली इंडस्ट्री; आता कुठे आहे अभिनेत्री?

Marathi News Live Updates : शिवसेना अन् राष्ट्रवादी कुणाची? २०२४ च्या 'लोकन्यायालया'चा दाखला देत फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना टोला

SCROLL FOR NEXT