कोस्टल रोडच्या बोगद्यात मध्यरात्री अपघाताचा थरार! सहा वाहनांची भीषण धडक, अनेक गाड्यांचे नुकसान
Coastal Road Accident: मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्यात मध्यरात्री सहा वाहनांची भीषण धडक झाली. या अपघातात अनेक गाड्यांचे नुकसान झाले असून घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
मुंबई : मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्यात सहा वाहनांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.