Corona's strong spread in the city ... Twelve more positive 
अहिल्यानगर

नगरमध्ये कोरोनाचा जोरदार फैलाव...आणखी बारा जण पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा

नगर ः शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा जोरदार फैलाव होऊ लागला आहे. नागरिकांनी अति दक्षता घेण्याची गरज आहे. आज तब्बल आणखी बारा कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यात संगमनेर सात, पारनेर, नगर शहर प्रत्येकी दोन, अकोले तालुक्‍यातील एका जणाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 296वर पोचली आहे. आज आणखी आठ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 245वर पोचली आहे. 

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोल्हेवाडी (संगमनेर) येथील 44 वर्षांचा व 60 वर्षांचा पुरूष, तसेच राजवाडा (संगमनेर शहर) 38 वर्षीय महिला, दिल्ली नाका येथील 42 वर्षांचा पुरुष, नाईकवाडपुरा येथील 65 वर्षांची महिला व 36 वर्षांचा पुरुष, भारत नगर येथील 70 वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय गोरेगाव (पारनेर) येथील 30 वर्षांचा पुरुष, भोयरे पठार येथील 28 वर्षांचा पुरुषाचा समावेश आहे. यापूर्वीच्या बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कामुळे यांना संसर्ग झाला आहे. नगर शहरातील झेंडीगेट येथील 54 वर्षांचा पुरुषाला, नालेगाव येथील 58 वर्षीय महिला, कोतूळ (अकोले) येथील 48 वर्षांचा पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

आणखी आठ जणांची कोरोनावर मात 
अहमदनगर जिल्ह्यातील आणखी आठ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. त्यात नगर शहर चार, राहाता तीन, संगमनेर येथील एकाचा समावेश आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना निरोप दिला. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता 245 झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT