Corporator's help for Shevgaon's Kovid Center
Corporator's help for Shevgaon's Kovid Center 
अहमदनगर

शेवगावच्या कोविड सेंटरसाठी सरसावले नगरसेवक

सचिन सातपुते

शेवगाव : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने, त्यांना उपचारासाठी जागा आणि सुविधांच्या उपलब्धतेत प्रशासनासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नगरसेवक मदतीसाठी सरसावले असून, त्यांनी विविध स्वरूपात केलेल्या मदतीमुळे प्रशासनावरील ताण हलका झाला आहे.

शहरात गेल्या काही दिवसांतील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, याबाबत उपाययोजनांसाठी तहसील कार्यालयात तहसीलदार अर्चना भाकड, नायब तहसीलदार मयूर बेरड, मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्यासह नगरपरिषद पदाधिकारी व नगरसेवक यांच्यात बैठक झाली.

वाढत्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात जागा उपलब्ध नाही, तसेच प्रशासनासमोर निधीची अडचण निर्माण झाली आहे. यापूर्वी घेतलेल्या सुविधांचे तीन ते चार लाख रुपये अदा करणे बाकी आहे. खाटा, गाद्या, पीपीई कीट, सॅनिटायझर, मास्क आदी साहित्य संपले आहे.

प्रशासनासमोरील या अडचणी तहसीलदार भाकड यांनी सांगताच नगराध्यक्ष राणी विनोद मोहिते व नगरसेवक सागर फडके यांनी प्रत्येकी 50, अशा 100 गाद्या, उपनगराध्यक्ष वजीर पठाण यांनी पीपीई किटसाठी 11 हजार रुपये, नगरसेवक शब्बीर शेख व उमर शेख यांनी 100 लिटर सॅनिटायझर, नगरसेवक विकास फलके व अजय भारस्कर यांनी पाण्याच्या बाटल्यांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये, तर दिगंबर काथवटे यांनी शंभर बेडशीट उपलब्ध करून देण्यासाठी तत्काळ मदत जाहीर केली. 

प्रवरा मेडिकल ट्रस्टने कोविड सेंटरसाठी त्यांच्या आयुर्वेद रुग्णालयात 110 बेडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान, शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 207वर गेली असून, त्यांतील 132 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 73 जणांनी कोरोनावर मात केली असून, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

लॉकडाउनला व्यापाऱ्यांचा विरोध 
शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन, संसर्ग रोखण्यासाठी शहर पुन्हा आठ दिवसांसाठी पूर्णपणे बंद करण्याची मागणी नगरपरिषदेतील कोरोना सुरक्षा समितीने केली होती. त्यास शहरातील दुकानदार, व्यापारी व काही संघटनांनी विरोध केला. "बंद'बाबत दोन वेगवेगळे मतप्रवाह आहे. या बाबत शहरवासीयांमध्ये संभ्रम निर्माण झाला. वारंवार दुकाने बंद ठेवल्यामुळे अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याने, सूचना व उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करून दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी वाढत आहे. गुरुवारपासून होणारे लॉकडाउन रद्द करण्यात आल्याचे समजते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

Anil Navgane Attack: ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला, भरत गोगावलेंच्या पुत्रासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

Gautam Adani: कोण आहेत गौतम अदानींचे राईट हँड? डॉक्टर ते उद्योगपती असा आहे प्रवास; चालवतात 20,852 कोटींची कंपनी

Parineeti Chopra : पतीसाठी परिणीतीच्या लंडनला फेऱ्या; राघववर पार पडली मोठी शस्त्रक्रिया

SCROLL FOR NEXT