The Kovid Center at Shirdi will be reopened
The Kovid Center at Shirdi will be reopened 
अहमदनगर

शिर्डीचे कोविड सेंटर पुन्हा सुरू होणार, महसूलमंत्र्यांनी घेतली बैठक

सतीश वैजापूरकर

शिर्डी ः जिल्ह्यात कोविडची दुसरी लाट सुरू आहे. बेड कमी पडू लागल्याने रुग्णांची परवड सुरू आहे. अशा कठीण काळात साईसंस्थानची वैद्यकीय व्यवस्था जिल्ह्याभरातील सामान्य कोविड रुग्णांना दिलासा देऊ शकते का, याची चाचपणी करण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल येथे येऊन बैठक घेतली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना त्याबाबत सूचना दिल्या.

संस्थानच्या दोन्ही रुग्णालयांपैकी एकाचे कोविड रुग्णालयात रूपांतर झाले असते, तर आज जिल्ह्यातील चित्र वेगळे असते. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर का होईना, त्या दृष्टीने पावले पडायला सुरवात झाली आहे. 

साईसंस्थानकडे अडीचशे खाटांची दोन सुसज्ज रुग्णालये आहेत. त्यातील एका रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात करता येईल काय, असे सूतोवाच जिल्हाधिकारी भोसले यांनी केले. कोविड प्रकोपामुळे विदर्भ व मराठवाड्यातून अन्य आजारांचे रुग्ण येणे थांबले आहे. किमान एका रुग्णालयाचे कोविड रुग्णालयात रूपांतर करण्याचा निर्णय घ्यायचा कुणी, ही येथील मुख्य समस्या आहे. संस्थानने ही दोन्ही रुग्णालये रुग्ण कमी असतानाही सुरू ठेवली. 

या दोन रुग्णालयांव्यतिरिक्त 475 खाटांचे नवे कोविड उपचार केंद्र सुरू केले आहे. त्यातील साठपैकी एकही ऑक्‍सिजन बेड आज मोकळा नाही. व्हेंटिलेटर अवघे पाच आहेत. त्यातील एकही मोकळे नाही. येथे एक हजार रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची गरज असताना कसेबसे शंभर इंजेक्‍शन मिळालेत. डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांची वानवा आहे.

रुग्णसेवेचा दर्जा सुधारण्याची गरज आहे. सध्याच्या कठीण काळात हे रुग्णालय सामान्यांना वरदान ठरले आहे. सरकारी यंत्रणेचे त्यासाठी फारसे सहकार्य मिळत नाही. आमदार, खासदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आजवर अनेकदा बैठका घेतल्या. त्यातून समस्या मार्गी लागल्या नाहीत. अहमदनगर

रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची अडचण काही दिवसांत दूर होईल. या इंजेक्‍शनच्या वितरणाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 
-बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT