Crime against Vijay Makasare
Crime against Vijay Makasare 
अहमदनगर

डॉ. विजय मकासरे यांच्याविरूद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा

विलास कुलकर्णी

राहुरी : समन्स बजाविण्यासाठी आलेल्या श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यास अरेरावी व शिवीगाळ केल्याप्रकरणी वळण (ता. राहुरी) येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय मकासरे यांच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला. 

श्रीरामपूर पोलिस ठाण्यातील कर्मचारी संदीप कमलाकर कानडे यांनी मकासरे यांच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तीत म्हटले आहे, की रविवारी (ता. 18) सकाळी 10 वाजता मकासरे यांना समन्स बजाविण्यासाठी वळण येथील त्यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी मकासरे यांनी समन्स घेण्यास नकार दिला. अरेरावी केली. काही वेळाने समन्सवर सही करतानाही शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा आणला. 

श्रीरामपूर तालुक्‍यातील एकलहरे शिवारात पकडलेल्या 54 लाख रुपयांच्या गुटखाप्रकरणातील संशयित मुख्य आरोपींना पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट हे पाठीशी घालत असल्याचा आरोप करणारी तक्रार मकासरे यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांची भेट घेऊन केली होती. त्यानंतर डॉ. दिघावकर यांनी श्रीरामपूरच्या अपर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना चौकशीचा आदेश दिला. 

दरम्यान, बहुचर्चित गुटखा प्रकरणाचा बहिरट यांच्याकडील तपास काढून घेण्यात आला. विशेष म्हणजे, श्रीरामपूरचे पोलिस अधीक्षक राहुल मदने यांना डावलून हा तपास शिर्डीच्या पोलिस उपअधीक्षकांकडे सोपविण्यात आला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मदने यांच्याच अधिपत्याखालील राहुरी पोलिस ठाण्यात मकासरे यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या या गुन्ह्याची पोलिस वर्तुळात राज्यभर चर्चा सुरू आहे. 

पोलिस कॉन्स्टेबल संदीप कानडे यांनी आणलेल्या समन्सवर कोणताही वाद न करता, सही करून दिली. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी माझ्याविरुद्ध कानडे यांच्या फिर्यादीनुसार, कोणतीही शहानिशा न करता राहुरी पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाल्याचे समजले. पोलिस निरीक्षक बहिरट यांच्याविरुद्ध तक्रार केल्याने माझे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी हा खोटा गुन्हा दाखल केला आहे. 
- डॉ. विजय मकासरे, सामाजिक कार्यकर्ते, वळण 

संपादन - अशोक निंबाळकर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi News: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस अलर्ट, सर्च ऑपरेशन सुरु

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Meta AI : व्हॉट्सअ‍ॅपवर कसं वापरायचं 'मेटा एआय'? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

"लग्न म्हणजे केवळ नाच-गाणी नाही.. आवश्यक विधींशिवाय झालेला हिंदू विवाह अमान्य"; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Share Market Holiday: आज महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहणार का? पाहा सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT