nagar urban bank 150 crore fraud sakal
अहिल्यानगर

‘अर्बन’मध्ये १५० कोटींचा गैरव्यवहार

माजी संचालक राजेंद्र गांधी यांची फिर्याद ; माजी संचालक, कर्जदार, व्यवस्थापकावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : नगर अर्बन बॅंकेच्या २०१४ ते २०१९ या काळात संचालक व अधिकाऱ्यांनी बॅंक, खातेदार व सभासदांचा विश्‍वासघात करून सुमारे १५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. बॅंकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन अध्यक्ष, संचालक सदस्य, कर्जदार, बॅंकेचे अधिकारी व मुख्य शाखेचे व्यवस्थापक आदींवर गुन्हा दाखल झाला आहे.

माजी संचालक राजेंद्र गांधी हे १९८४ पासून बॅंकेचे सभासद व खातेदार आहेत. सन २००८ ते २०१४ या कालावधीत ते बॅंकेचे संचालक होते. बॅंकेच्या दरवर्षी होणाऱ्या वैधानिक लेखापरीक्षणाची त्यांना माहिती आहे. बॅंकेतील अनेक गैरव्यवहार त्यांनी बाहेर काढले आहेत. सन २०१५ पासून नगर अर्बनची मुख्य शाखा व इतर कार्यालयांमध्ये झालेल्या गैरव्यवहारांमुळे सभासदांना लाभांश व ठेवीदारांना त्यांचा परतावा, ठेवीची रक्कम व त्यांच्या इतर खात्यांतील रकमा परत मिळत नाहीत. बॅंकेच्या संचालक मंडळ, वरिष्ठ अधिकारी, काही कर्जदार व इतर संबंधित व्यक्तींनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करून बॅंकेचे अपरिमित नुकसान केले.

गांधी यांनी याप्रकरणी प्रशासक, रिझर्व्ह बॅंक, तसेच पोलिस अधीक्षकांशी वेळोवेळी पत्रव्यवहार करून दोषींवर कारवाईची मागणी केली होती. तसेच, औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षकांना आदेश देण्याची मागणी केली होती. त्यानंतर डॉ. नीलेश शेळके व इतर डॉक्‍टरांच्या २३ कोटी ९० लाख रुपयांच्या कर्जप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

शेवगाव पोलिस ठाण्यात बनावट सोने तारणप्रकरणी पाच कोटी ३० लाख रुपये कर्जप्रकरणाबाबत, चिंचवड पोलिस ठाण्यात पिंपरी-चिंचवड शाखेतील २२ कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणाबाबत गुन्हे दाखल आहेत. याशिवाय आतापर्यंतच्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालानुसार आणखी गैरव्यवहार समोर आले आहेत. बॅंकेने करमाळ्याच्या यशराज वायनरी कंपनीला कर्ज मंजूर केले, पण ही कंपनीच अस्तित्वात नाही. विविध प्रकारची नियमबाह्य, बनावट कर्जप्रकरणे करून, तसेच सोने तारण व्यवहारात बॅंकेची एकूण सुमारे दीडशे कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे गांधी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

लेखापरीक्षणात २७ प्रमुख गैरव्यवहारांवर ठपका

१) मे. पारिस इस्पात (संगमनेर), २) मे. पुखराज ट्रेडिंग कंपनी (संगमनेर), ३) मे. पुखराज इस्पात (संगमनेर), ४) हॉटेल सिटी हर्ट (शिर्डी), ५) एस. एस. डेव्हलपर्स (शिर्डी), ६) तुकाराम एकनाथ एखंडे (जालना), ७) हॉटेल साई संगम (शिर्डी), ८) मंत्रा प्रिंटर्स (केडगाव), ९) घृष्णेश्वर मिल्क प्रॉडक्ट्स (श्रीगोंदे), १०) हिंदुस्थान ट्रेडर्स (राहाता), ११) ब्युटी वर्ल्ड (राहाता), १२) ए. आर. टेक्‍नॉलॉजिस मुख्य शाखा, १३) जिजाई मिल्क (श्रीगोंदे), १४) गगन बिल्डर्स (गुलटेकडी, पुणे), १५) टेरासॉफ्ट टेक्‍नॉलॉजी (या फर्मचा अहमदनगर मर्चंट्‌स बॅंकेतील खात्यात झालेला १०० कोटींचा व्यवहार संशयास्पद), १६) मनुराज डेव्हलपर्स (जालना) यांना फसवून चार कोटी ८५ लाखांचे कर्ज दिले, त्यांनी हे कर्ज नाकारलेले आहे, १७) साईसुजाता हॉस्पिटल, करमाळा (जि. सोलापूर) येथील यशराज वायनरी कंपनीला २४ कोटींचे कर्ज दिले. मात्र, ही कंपनीच अस्तित्वात नाही. १८) तत्कालीन अध्यक्ष व दिवंगत खासदार दिलीप गांधी यांच्या खात्यातील संशयास्पद गैरव्यवहार, १९) संचालक अशोक माधवलाल कटारिया यांच्या ढोकेश्वर ग्रामीण पतसंस्थेला दिलेल्या कर्जवसुलीसाठी स्वप्नील इंडस्ट्रीज, निखिल इंडस्ट्रीज व सुरेश इंडस्ट्रीजचे या नावाने तीन कोटींचे कर्ज. २०) औरंगाबाद शाखेत सोने तारण गैरव्यवहार एक कोटी २१ लाख रुपये, २१) सिन्नर शाखेत एक लाख ४५ हजार रुपये, २२) चाकण शाखेत सोने तारण, २३) रेणुकामाता मल्टिस्टेट पतसंस्थेचा सोनेतारणाचा व्यवहार संशयास्पद आहे. २४) बॅंकेच्या संचालक मंडळाने बनावट आर्थिक पत्रके रिझर्व्ह बॅंकेला सादर केली होती. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने ४० लाखांचा दंड ठोठावला होता. सदरचा दंड संचालकांकडून वसुली करण्याकडे दुर्लक्ष केले. २५) आर. बी. के. कन्स्ट्रक्‍शन प्रा. लि. पाथर्डी, २७) संचालक मंडळाने जेऊर (ता. नगर) येथे खरेदी केलेली शेतजमीन संशयास्पद व बेकायदेशीर आहे. या व्यवहाराला रिझर्व्ह बॅंकेची परवानगी घेतली नाही.

आरोपींमध्ये यांचा समावेश

बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष व दिवंगत खासदार दिलीप गांधी, त्यांचे निकटवर्तीय आशुतोष सतीश लांडगे, सचिन गायकवाड, रेणुकामाता मल्टिस्टेट सोसायटी व बॅंकेचे तत्कालीन मुख्य शाखा व्यवस्थापक अच्युत घनश्‍याम बल्लाळ यांच्यावर फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर करणे, बनावट कागदपत्रे खरी म्हणून वापरणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT