anna hajre sakal
अहिल्यानगर

गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही

अण्णा हजारे ; जवळे येथील अत्याचाराची घटना मानवतेला कलंक

सकाळ वृत्तसेवा

पारनेर : राज्यातील महिला, विशेषतः अल्पवयीन मुलींवर अत्याचार होताना दिसत आहेत. याचा अर्थ, आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही. असे गुन्हे म्हणजे मानवतेला कलंक आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांवरच जर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतील, तर गुन्हेगारांवर कसा धाक राहणार, असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.

तालुक्यातील जवळे येथील अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यावर प्रतिक्रिया देताना हजारे बोलत होते. या वेळी हजारे यांनी सरकारमध्ये असलेल्या लोकांच्या भूमिकेबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, की जर दिवसाढवळ्या महिलांवर अत्याचार होत असतील, तर राज्यातील महिला सुरक्षित नाहीत, असा अर्थ होतो. या निमित्ताने राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही, असेही दिसून येते. ज्यांनी कायदे करायचे, कायदा- सुव्यवस्था राखायची, तेच भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकले असतील, तर दोष कोणाला द्यावा, असेही ते म्हणाले.

महिला व विशेषतः अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार ही गंभीर बाब आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नसल्याने असे प्रकार होत आहेत. त्यामुळे येत्या अधिवेशनात कठोर कायदे करावेत, अशी मागणी करीत, अशा गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षेशिवाय दुसरी शिक्षा असता कामा नये, त्याशिवाय असे अत्याचाराचे गुन्हे थांबणार नाहीत, असे हजारे म्हणाले. जवळे येथील घटनेचा निषेध करीत ते म्हणाले, की या घटनेत बिचाऱ्या मुलीचा काय दोष आहे, की तिला अशी शिक्षा मिळाली. आता गुन्हेगार शोधून त्यांना तातडीने कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी हजारे यांनी केली.

पोलिसांचा वचक संपला

देशात घटना सर्वोच्च आहे. घटनेनुसार कठोर कायदे करावेत. कायद्यांची कडक अंमलबजावणी केली तरच गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल. यात पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. पोलिसांचा वचक राहिला नसल्याने अशा दुर्दैवी घटना घडतात, असेही अण्णा म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT