Home quarantine in nagar 
अहिल्यानगर

सावधान...नगरमध्ये येताय, महापालिकेने घेतलाय हा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

नगर ः सरकारने वैद्यकीय तपासणीनंतर अत्यावश्‍यक कारणासाठी बाहेरगावी जाण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे नगर शहरात परराज्य व परजिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बाहेरून येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करून महापालिका त्यांना "क्‍वारंटाईन' करणार आहे. त्यासाठी महापालिका आयुक्‍तांनी प्रभागनिहाय सुरक्षा समिती स्थापन केली आहे. 

ऊसतोड कामगार, परराज्यांतील अथवा परजिल्ह्यांतील व्यक्‍ती, विद्यार्थी, पर्यटक, भाविक नगर शहरात येत आहेत. नगर शहर कोरोनामुक्‍त झाले असून, पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी प्रभाग सुरक्षा समित्या स्थापन केल्या आहेत. शहरात 17 प्रभाग असल्याने 17 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. समितीत संबंधित प्रभागाचे चारही नगरसेवक व महापालिकेकडून एक डॉक्‍टर व सात कर्मचारी नियुक्‍त केले आहेत. 

बाहेरून शहरात वास्तव्यास येणाऱ्या व्यक्‍तींना, प्रशासनाची परवानगी नसल्यास शहरात प्रवेश दिलाच जाणार नाही. तथापि, परवानगी असल्यास जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून संबंधित व्यक्‍तीच्या हातावर "क्‍वारंटाईन'चा शिक्‍का मारून निश्‍चित केलेल्या ठिकाणी विलगीकरण केले जाणार आहे. बाहेरून नगरमध्ये वास्तव्यास आलेल्याचे नाव व इतर माहिती समितीला ठेवावी लागेल. आरोग्य विभागातर्फे या व्यक्तींची तपासणी तत्काळ केली जाणार आहे. 

बाहेरून येथे आलेल्या व्यक्तींना 14 दिवस संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक असेल. तसेच, संबंधितांच्या हातांवर शिक्‍के मारण्यात येणार आहेत. तसे न केल्यास कारवाई केली जाणार आहे. सारी व कोरोनासदृश आजाराची लक्षणे आढळून आल्यास संबंधित व्यक्‍तीची माहिती तत्काळ वैद्यकीय आरोग्य विभागास देण्यात येईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काव्या मारनने एवढ्या आनंदाने अबरार अहमदला संघात घेतले; पाकड्यांनी दाखवली लायकी, The Hundred मधून घेऊ शकतो माघार...

Narhari Zirwal : अन्न भेसळीविरोधात झिरवाळ आक्रमक! १९७ नवीन अधिकाऱ्यांची फौज मैदानात, कठोर कायद्याची तयारी

Devendra Fadanvis: 'गॅससाठी रांगा लावू नका', फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Pimpalgaon Ttoll Plaza : टोल की लूट? पूर्वसूचना न देता स्थानिक पास धारकांना बसतोय आर्थिक फटका; आंदोलनाचे संकेत

Latest Marathi News Live Update : आर्मी ऑफिसर बनून डॉक्टरची सायबर फसवणूक

SCROLL FOR NEXT