

Latest Marathi News Live Update
esakal
अकोला शहरातील एका नामांकित चिटफंड कंपनीकडून ‘बी.सी.’चे पैसे मिळाले नसल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. कंपनीकडून पैसे मिळत नसल्याने संबधित ग्राहकांनी पोलिस स्टेशनला धाव घेतली आहे. कंपनीच्या संचालकांनी फसवणूक केल्याची तक्रार जया जयंत देशमुख यांच्यासह काही महिला ग्राहकांनी केली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तर साईराम कुरीज प्रा. लि. कंपनीच्या संचालकांनी हा आरोप खोटा असल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे याप्रकरणातील गुंतागुंत अधिकच वाढली आहे.