Dhangar Reservation sakal
अहिल्यानगर

Dhangar Reservation : धनगर - धनगड एक असल्याचा आदेश काढा - विजय तमनर

राज्यामध्ये गेल्या ७० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धनगर आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला आहे.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : राज्यामध्ये गेल्या ७० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धनगर आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला आहे. धनगर व धनगड एक असल्याचा आदेश काढावा; अन्यथा आयुक्त तथा अध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, छत्रपती संभाजीनगर कार्यालयासमोर मंगळवार (ता.८) पासून उपोषण करण्याचा इशारा यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

जिल्हा शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेस सचिन डफळ, नांदगावचे सरपंच सखाराम सरक, कांतिलाल जाडकर, पोपटराव शेंडगे, पांडुरंग दातीर, दादाभाऊ तमनर, वैभव तमनर, अशोकराव कोळेकर, राजू तागड, अशोकराव होनमाने आदी उपस्थित होते.

तमनर म्हणाले की, धनगर समाज आता जागृत झाला आहे. नव्याने अभ्यास करणारी मुलं, यांना आपली फसवणूक झाल्याची जाणीव झालेली असल्याने अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने संविधानाला धरून न्यायिक मागणी या तरुण वर्गाकडून लावून धरली जात आहे.

यामध्ये कोणत्याही समाजावर अन्याय करण्याची भूमिका नाही. धनगर समाजाकडून न्याय हक्काच्या मागणीसाठी पंढरपूर येथे १६ दिवस आमरण उपोषण करण्यात आले. राज्यातील इतर पाच सहकाऱ्यांसमवेत स्वतः उपोषण केले आहे. उपोषणाच्या स्थळी शासकीय जबाबदार सदस्यांनी भेट दिली आणि शासन स्तरावर याबाबत हालचाली सुरू झाल्या.

या अनुषंगाने १५ सप्टेंबर २०२४ रोजी राज्य शासनाच्या सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री, संबंधित विभागाचे मंत्री आणि जबाबदार अधिकारी बैठकीच्या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला निर्देश दिलेले, प्रत्येक विषयाला पूर्ततेसाठी विहित कालावधी दिला होता. त्या अनुषंगाने कोणतेही कामकाज संबंधित विभागाने विहित वेळेत पार पाडले नसल्याचे समोर आलेले आहे.

धनगड व धनगर एकच असल्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात येऊन, राज्यातील जात पडताळणी समित्या व प्रांताधिकाऱ्यांना याबाबत सदर शासन निर्णयातच निर्देश द्याव्यात, तत्काळ राज्यातील धनगरांना अनुसूचित जमातीतील जातीचे दाखले व वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत आदेशित करावे, ही समाजाची प्रमुख मागणी आहे.

राज्यामध्ये धनगर समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी धनगर समाजाच्या विविध संघटनांनी केलेल्या विधायक आंदोलनाच्या प्रसंगी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबत तत्काळ गृह विभागाला आदेशित करून, सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT