
Team India wins Men Hockey Asia Cup
ESakal
भारत पुन्हा एकदा आशिया चॅम्पियन बनला आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुरुष हॉकी आशिया चषक जिंकला. राजगीर येथे खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने गतविजेत्या दक्षिण कोरियाचा ४-१ असा एकतर्फी पराभव केला आणि यासह चौथ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. या विजयासह टीम इंडियाने नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये खेळल्या जाणाऱ्या FIH पुरुष विश्वचषक २०२६ साठी देखील पात्रता मिळवली आहे.