Demand for discontinuation of retirement pay of MLAs and MPs 
अहिल्यानगर

आमदार, खासदारांचे सेवानिवृत्ती वेतन बंद करण्याची मागणी 

आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : कोरोनामुळे संपूर्ण जगासह देशातही आर्थिक मंदी पसरली असून देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. विश्व बॅंकेसह विविध देशांकडून घेतलेल्या कर्जाच्या गर्तेत देश सापडला आहे. यातून सावरण्यासाठी आमदार, खासदारांना आजीवन देण्यात येणाऱ्या विविध सेवा सवलती व सेवानिवृत्ती वेतन, विशेष कायदा करुन कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी गणराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष किशोर चव्हाण यांनी केली. 

याबाबत त्यांनी राज्यपालांसह सर्व नेत्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे, देशाची अर्थव्यवस्था घसरणिला लागल्याने, सरकारी मालकीच्या कंपन्या विकण्याची नामुष्की देशावर आली आहे.

देश आर्तिक संकटाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी शक्‍य त्या सर्व उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. सरकारी नोकरांना 25 ते 40 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्तीवेतन मिळते. मात्र, राजकिय नेत्यांना केवळ पाच वर्षाच्या कालावधीत केलेल्या सेवेबद्दल आजिवन निवृत्ती वेतनासह सर्व सुविधा पुरविण्याचा कायदा आहे. अनेक प्रश्नांनी देश व्यापला आहे. देशाच्या तिजोरीवर पडणारा अवाजवी बोजा कमी करण्यासाठी सर्व राज्यकर्त्यांनी दिलदारपणाने निवृत्तीवेतन नाकारण्याचा मोठेपणा दाखवण्याची ही वेळ आहे. 


संपादन : अशोक मुरूमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! विद्यार्थी-शिक्षकांची आता ऑनलाईन हजेरी; सर्व शाळांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत, त्यानंतर मुख्याध्यापकांवर होणार शिस्तभंगाची कारवाई

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यात पाच ठिकाणी ईडीचे छापे'; दोन जणांना घेतले ताब्यात, नेमकं काय आहे कारण?

‘टीईटी’चा निकाल १५ जानेवारीपूर्वी! उत्तरसूचीवरील आक्षेपासाठी २८ डिसेंबरपर्यंत मुदत; प्रत्येक उत्तरपत्रिकेची होणार फेरपडताळणी, पुढच्या वर्षी दोनदा ‘टीईटी’

सोलापूर शहरातून 2 वर्षांत 155 जण तडीपार अन्‌ 50 गुन्हेगारांची येरवडा कारागृहात रवानगी; पोलिस आयुक्तांची रेकॉर्ड ब्रेक कारवाई; गुन्हेगारांचे धाबे दणाणले

आजचे राशिभविष्य - 24 डिसेंबर 2025

SCROLL FOR NEXT