सोलापूर शहरातून 2 वर्षांत 155 जण तडीपार अन्‌ 50 गुन्हेगारांची येरवडा कारागृहात रवानगी; पोलिस आयुक्तांची रेकॉर्ड ब्रेक कारवाई; गुन्हेगारांचे धाबे दणाणले

पोलिस आयुक्तांनी पहिल्यांदाच गोतस्करी करणाऱ्या टोळीवर तडीपार, स्थानबद्धतेची कारवाई केली. याशिवाय दोन गटांत हाणामारी, शासकीय कार्यालयांबाहेर आंदोलन करुन अधिकाऱ्यांना वेठीस धरणाऱ्यांवर देखील प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला.
solapur city cp m raj kumar

solapur city cp m raj kumar

sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : मागील आठ वर्षांत शहराची शांतता व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या ५१० सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी तडीपार केले आहे. फेब्रुवारी २०२४ ते १५ डिसेंबर २०२५ या काळात पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी १५५ सराईत गुन्हेगारांना तडीपार करीत रेकॉर्डब्रेक कारवाई केली आहे. तसेच ५० गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करून येरवडा कारागृहात पाठविले आहे.

सोलापूर शहरात सदर बझार, एमआयडीसी, विजापूर नाका, जोडभावी पेठ, जेलरोड, फौजदार चावडी, सलगर वस्ती अशी सात पोलिस ठाणी आहेत. पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालींची माहिती अधिकाऱ्यांनी घेऊन ठेवली आहे. पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांच्या कार्यकाळात सर्वाधिक सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. याशिवाय पोलिस आयुक्तांनी पहिल्यांदाच गोतस्करी करणाऱ्या टोळीवर तडीपार, स्थानबद्धतेची कारवाई केली.

याशिवाय दोन गटांत हाणामारी, शासकीय कार्यालयांबाहेर आंदोलन करुन अधिकाऱ्यांना वेठीस धरणाऱ्यांवर देखील प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला. पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्यांवर विशेष लक्ष ठेवले. पोलिस ठाण्यांकडून प्रस्ताव मागवून त्यांना सोलापूर शहर-जिल्ह्यातून व शेजारील जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले. मागील सहा वर्षांच्या तुलनेत मागील दोन वर्षांतील कारवाई रेकॉर्डब्रेक ठरली आहे.

तडीपारीची कारवाई अशी...

  • वर्ष तडीपार

  • २०१८ ६१

  • २०१९ ९४

  • २०२० ४२

  • २०२१ ७९

  • २०२२ ३०

  • २०२३ ४९

  • २०२४ ७३

  • २०२५ ८२

  • एकूण ५१०

स्थानबद्धतेची कारवाई अशी...

  • वर्ष तडीपार

  • २०१८ ०८

  • २०१९ ११

  • २०२० ०८

  • २०२१ १४

  • २०२२ ०८

  • २०२३ ०९

  • २०२४ २५

  • २०२५ २५

  • एकूण १०८

यापुढेही होईल अशीच कारवाई

सोलापूर शहराची शांतता, सुव्यवस्थेला गालबोट लागेल असे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांवर सर्व पोलिस ठाण्यांच्या माध्यमातून विशेष लक्ष ठेवले जात आहे. सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, व्यावसायिकांसह सर्वच घटकांना मुक्त वावरता यावे, यादृष्टीने रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर तडीपार, स्थानबद्धतेची कारवाई होते. प्रतिबंधात्मक कारवाई करूनही ज्यांच्या वर्तनात सुधारणा होत नाही, अशांवर पुढेही अशीच कडक कारवाई होईल.

- एम. राजकुमार, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

‘एमपीडीए’ची कारवाई कोणावर होते...

महाराष्ट्र प्रतिबंधात्मक कारवाई अधिनियमानुसार (एमपीडीए) गुन्हेगार, तस्कर, अंमली पदार्थांचे व्यसनी आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणाऱ्या धोकादायक व्यक्तींवर कारवाई केली जाते. जे लोक दहशत पसरवतात किंवा गंभीर गुन्हे करतात, बेकायदेशीर दारू किंवा अंमली पदार्थ विकतात किंवा वापरतात, समाजात भीती निर्माण करून सार्वजनिक शांतता भंग करतात, बेकायदा चित्रपट किंवा व्हिडिओ सोशल मीडियावरून प्रसारित करून सामाजिक शांतता बिघडवितात, अशांवर स्थानबद्धेची कारवाई केली जाते. कारवाईनंतर त्यांची रवानगी थेट पुण्यातील येरवडा कारागृहात केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com