The demand Requests and reciprocal transfers instead of administrative ones 
अहिल्यानगर

प्रशासकीय ऐवजी विनंती व आपसी बदल्या करा 

सकाळ वृत्तसेवा

नगर : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांऐवजी विनंती व आपसी बदल्या करण्यात याव्यात, अशी मागणी जिल्हा परि,द कर्मचारी युनियनतर्फे करण्यात आलेली असून या बाबतचे निवेदन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आलेले आहे. 
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे 2020-21 या वित्तीय वर्षात राज्य सरकारने वित्त विभागाने मुख्य सचिव यांच्या सहीने आर्थिक काटकसरीचे धोरणाखाली जे आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार या आर्थिक वर्षात पदभरती व बदली करण्यात येवू नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यावर राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनतर्फे शासनावर आर्थिक बोजा न पडता केवळ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या विनंती , आपसात विनंती, विधवा, परितक्‍त्या, अपंग तसेच दुर्धर आजाराने आजारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याबाबत शासनाला निवेदनानुसार ग्रामविकास विभागास विनंती केलेली आहे. परंतु आता प्रशासकीय बदल्यांचा आदेश जारी करण्यात आलेला असून त्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. यामुळे शासनाच्या तिजोवरील आर्थिक बोजा पडणार असल्यामुळे ही प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर अध्यक्ष बलराज मगर, बाबुराव पुजरवाडे, विवेक लिंगराज, शरद भिडे, राज्य उपाध्यक्ष सुभाष कराळे, जिल्हाध्यक्ष विकास साळुंके, किशोर शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT