

Rupali Chakankar resignation
ESakal
महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवीन खुलासे समोर येत आहेत. महिलांच्या लैंगिक छळाच्या आरोपांनंतर आता नरबळी, गर्भपात, जादुई मध आणि व्हायग्रा मिसळलेले पाणी विकणे, तसेच प्रचंड संपत्ती जमवल्याचे आरोपही त्याच्यावर आहेत. या सर्व प्रकारामुळे, अशोक खरात यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या रूपाली चाकणकर यांच्यावर सुनेत्रा पवार कारवाई करतील का, असा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. रूपाली चाकणकरांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यासोबत त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे.