

IPL 2026 Trophy Prediction
ESakal
आयपीएल २०२६ २८ मार्च रोजी सुरू होणार असून १० संघ विजेतेपदासाठी स्पर्धा करतील. हंगाम सुरू होण्यापूर्वी एका खेळाडूने एक धाडसी भविष्यवाणी केली आहे. या खेळाडूचे नाव आहे शशांक सिंग. पंजाब किंग्सचा फलंदाज शशांक सिंगला विश्वास आहे की, त्याचा संघ यावेळी आयपीएल २०२६ ची ट्रॉफी उंचावेल. गेल्या हंगामातील अंतिम सामना केवळ सहा धावांनी गमावूनही शशांकचा विश्वास आहे की पंजाब किंग्स ३१ मे रोजी बंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर विजेतेपद जिंकेल.