Devendra Fadnavis  Twitter
अहिल्यानगर

''सहकार चळवळ मोडीत निघाली असे म्हणणारेच कारखाने विकत घेतायेत''

सहकाराच्या मुळाची जाणीव असल्यानेच शहांची सहकार मंत्री म्हणून निवड.

निनाद कुलकर्णी

प्रवरानगर : सहकार चळवळ मोडीत निघाली असे म्हणणारेच सहकारी साखर कारखाने विकत घेत आहेत, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर नाव न घेता केली आहे. सहकारी साखर कारखाने नेत्यांच्या घशात घातले अशी टीका देखील त्यांनी केली. त्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकाराला जगविण्याचे काम केले असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. ते प्रवरानगर येथे आयोजित पहिल्या सहकार परिषदेत (Cooperative conference ) बोलत होते. या परिषदेला केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह (Minister Amit Shah maharashtra Tour) उपस्थित आहेत. यावेळी फडणवीस यांनी अनेक मुद्दे मांडले.

MSP लावल्याने खऱ्या अर्थाने सारख कारखाने तरले. यामुळे शेतकऱ्यांचे भले झाले आहे. शहा (Amit Shah) चळवळीतून तयार झालेले नेते आहेत. अमित शहांचे मूळ हे सहकार आहे, सहकाराच्या मुळाची जाणीव असल्यानेच अमित शहांची या ठिकाणी सहकार मंत्री म्हणून निवड झाल्याचे फडणवीस म्हणाले. शहा यांनी पहिला निर्णय साखर कारखान्यांना (Sugar Mill) आयकर विभागाच्या जाचातून बाहेर काढण्याचा घेतल्याचे त्यांनी सांगितले.

सहाकार जगला पहिजे हा मुद्दा लक्षात घेत सरकारने वेगळे सहकार खाते निर्माण करण्याचा निर्णय सरकारने घेतला ही खूप महत्वाची बाब असून, सहकार मोडीत निघाले असं सांगणारे सहकारी कारखाने विकत घेतायेत अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. सहकारी कारखाने नेत्यांच्या घशात गेले आहेत अशी परखड टीका देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पहिला साखर कारखाना जिथे सुरू झाला तेथे पहिली सहकार परिषद होत आहे ही खरोखरीच आनंदाची गोष्ट आहे. सहकाराला टिकवण्याचे काम जर कुणी केले असेल, तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले आहे. MSP लावल्याने खऱ्या अर्थाने सारख कारखाने तरले. यामुळे शेतकऱ्यांचे भले झाले. जी इथेलॉनची निती त्यामुळे साखर कारखान्याचे दिवस पलटले. इथेनॉलसंदर्भात शहा यांनी निर्णय घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT