Devotees hope to open the court of Goddess Bhagwati 
अहिल्यानगर

नवरात्रौत्सवातही शक्तीपीठ बंद, भगवती मातेचा दरबार उघडण्याची भाविकांना आस

सकाळ वृत्तसेवा

कोल्हार : साडेतीन शक्तिपीठांचा श्री भगवतीदेवीचा दरबार नवरात्रोत्सवातही बंद राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हार-भगवतीपूर देवालय ट्रस्ट व गावकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

यंदा आदिशक्तीचा जागर साध्या पद्धतीने होणार असल्याने भाविकांचा उत्साह मावळला आहे. या वर्षी देवीची पारंपरिक घटस्थापना, पूजाअर्चा व अन्य धार्मिक विधी साधेपणाने केले जाणार आहेत. मंदिरातील सेवेकरी व पुजारीच हे विधी करतील.

इतरांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. देवीची काकडआरती व सांजारतीला भाविकांना आदिशक्तीच्या दरबारात थांबता येणार नाही, तसेच आरतीच्या वेळी मंदिर परिसरात गर्दी करता येणार नाही. देवीचे दर्शन घेण्यासाठी गाभाऱ्यापर्यंत प्रवेश मिळणार नाही. 

होम कुंडाजवळील प्रवेशद्वाराजवळ देवीच्या पादुकांवर माथा टेकविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. परंपरेप्रमाणे कोल्हार व भगवतीपूरच्या पाटलांसह तळी व माळेचा कार्यक्रम, तसेच परगावांहून देवीच्या ज्योती घेऊन येणाऱ्यांना प्रतिबंध राहील.

मंदिर व परिसरात घटी बसण्यासाठी महिलांना ट्रस्टने मनाई केली आहे. मंदिर परिसरात दुकाने थाटण्यास मनाई केली आहे. बैठकीला ट्रस्टचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रघुनाथ खर्डे, ऍड. सुरेंद्र खर्डे, नंदकुमार खांदे, बाळासाहेब दा. खर्डे, श्रीकांत खर्डे, दिनकर कडसकर, प्रा. बापूसाहेब देवकर आदी उपस्थित होते. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Kondhwa News : बोपदेव घाट उतारावर सातत्याने अपघात; प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

farmer relief fund : विमा नसलेल्या बागांना हेक्टरी २२ हजारांची मदत; नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाकडून दिलासा

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT