

Abhishek Sharma Wicket | India vs Japan
Sakal
Japan vs India, T20I Match: भारतीय संघाने मंगळवारी (२२ सप्टेंबर) जपानविरुद्ध एकमेव टी२० सामन्यात २ धावांनी थराराक विजय मिळवला. भारतीय संघ पहिल्यांदाच जपानमध्ये जपानविरुद्ध खेळत होता. पण जपानने या सामन्यात भारतीय संघाची चांगलीच परिक्षा पाहिली.
पावसामुळे जवळपास ३ तास उशिराने हा सामना सुरू झालेला हा सामना प्रत्येकी ५-५ षटकांचा झाला होता. या सामन्यात भारताचा तुफान फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर अभिषेक शर्माला मात्र मोठा धक्का बसला. तो शुन्यावरच बाद झाल्याने त्याच्या नावावर नकोसे विक्रमही झाले.