काटोल नगराध्यक्षांचे पद धोक्यात; अर्चना देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Supreme Court Stays Nagpur Bench Order in Katol Case: काटोल नगराध्यक्ष अर्चना देशमुख यांच्या कुणबी जातवैधता प्रमाणपत्रासंदर्भातील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.
Archana Deshmukh

Archana Deshmukh

esakal

Updated on

नागपूर : काटोल नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अर्चना देशमुख यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले होते. जात पडताळणी समितीच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली होती. परंतु, उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे, देशमुख यांचे नगराध्यक्षपद धोक्यात आले आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशाला नगराध्यक्षपदाच्या प्रतिस्पर्धी उमेदवार कल्पना समीर उमप आणि अन्य याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणावर न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती श्रीचंद्रशेखर यांच्या समक्ष सुनावणी झाली. अर्चना देशमुख यांचे कुणबी जातवैधता प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने १९ जून २०२६ रोजी अवैध ठरविले होते.

Archana Deshmukh
Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

या निर्णयाला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने समितीच्या आदेशाला तसेच त्याआधारे काढण्यात आलेल्या परिणामी आदेश व अधिसूचनांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली होती.

समितीने जुन्या महत्त्वाच्या कागदपत्रांचा आणि दक्षता पथकाच्या अहवालाचा योग्य विचार केला नसल्याचे प्रथमदर्शनी न्यायालयाच्या निदर्शनास आले होते. तसेच, महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमातील संबंधित तरतुदींचे पालन झाले नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावली आहे.

Archana Deshmukh
IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

त्यामुळे, अर्चना देशमुख यांच्या नगराध्यक्षपदावरून पुढील कार्यवाही होण्याची शक्यता आहे. पुढील सुनावणी ३ नोव्हेंबर रोजी निश्चित करण्यात आली. याचिकाकर्त्यांतर्फे जेष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी आणि गौरव अग्रवाल यांच्यासह ॲड. महेश धात्रक, ॲड. मोहित खजांची यांनी बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com