रोहित पवार
रोहित पवार Esakal
अहमदनगर

जामखेडच्या कोविड सेंटरला रोहित पवारांकडून डिजीटल एक्स रे मशीन

वसंत सानप

जामखेड : जामखेड येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या "कोविड सेंटर" ला लागेल ती मदत आमदार रोहित पवारांच्या (Rohit Pawar) माध्यमातून होत आहे. अॉक्सीजन काँन्स्ट्रेटर पाठोपाठ यावेळी 'डिजिटल एक्स-रे' मशीन आणि अनुभवी मनुष्यबळ हॉस्पीटलला दिले आहे. त्यामुळे यापुढील काळात येथे दाखल होणाऱ्या रुग्णांची "एक्सरे " करिता होणारी धावपळ आणि फजिती थांबणार आहे. (Digital X-ray machine from Rohit Pawar to Covid Center, Jamkhed)

जामखेड येथे विनामूल्य उपचार घेणाऱ्या सर्वसामान्य, गोरगरीब रुग्णांना कोणतीच सुविधा कमी पडू नाही याकरिता आमदार रोहित पवार कार्यतत्पर आहेत. येथे बसविलेल्या डिजिटल एक्सरे मशीन कोरोना रुग्णाच्या तपासणीत 'निमोनिया' तसेच 'फुप्पुसाच्या' असलेल्या आजारांचे निदान होणार आहे.

अनेक रुग्णांना कोरोनाची लागण झाल्यानंतर निमोनिया होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, वेळेत निदान व वेळेत उपचार मिळणे शक्य असल्याने ही सुविधा फायदेशीर ठरणार आहे. कोरोना रुग्णांच्या या प्राथमिक तापसणीतच रुग्णांच्या आजाराची माहिती समजेल. कोरोनाचे निदान करण्यासाठी रुग्णांना सरसकट एच.आर.सी.टी स्कॅन तपासणीची गरज भासणार नाही. जरी ही तपासणी महत्वाची असली तरी 'एक्स रे' तपासणीतच आजाराचे निदान होईल. त्यामुळे या सुविधेमुळे रुग्णांचा खर्च वाचणार आहे. कोरोना रुग्णांवर तात्काळ उपचार करणे सोपे होईल, वेळ वाचेल.

आमदार रोहित पवारांच्या प्रत्येक दौऱ्यादरम्यान येथील कोविड सेंटरला वैद्यकीय उपचारार्थ लागणाऱ्या भौतिक सुविधांचा पुरवठा त्यांच्या मार्फत झाल्याने आरोळे कोविड सेंटर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचे केंद्र बनले आहे. यामध्ये पाच व्हेंटिलेटर, पंचवीस आँक्सीजन सिलेंडर, दोन आँक्सीजन बेड, ऐंशी आँक्सीजन काँन्स्ट्रेटर, दोन ड्युरा सिलेंडर, मुख्य हाँस्पीटल अंतर्गत आँक्सीजन पाईपलाईन, पीपीई किट, पल्स आँक्सीमीटर, ग्लोज, सँनिटायझर, रुग्णांना शुध्द पाणीपुरवठा करणारा प्लँट, जम्बो कोविड सेंटरचा संपूर्ण सेटअपचा समावेश आहे.

आमदार रोहित पवारांनी जामखेड येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्पा अंतर्गत सुरु असलेल्या कोविड सेंटरचे पालकत्व स्वीकारुन रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय साहित्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात केला आहे. तसेच आमदार पवारांची एक टीम येथील सेंटरच्या मदतीसाठी नियमित कार्यरत आहे. कोविड सेंटरला आँक्सीजन पुरवठा सुरळीत करण्यापासून लहानसहान अडचणीं सोडविण्यासाठी त्यांची मदत होत आहे.

(Digital X-ray machine from Rohit Pawar to Covid Center, Jamkhed)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT