District Collector orders selection of 84 talathas in Nagar district 
अहिल्यानगर

निवड झालेल्या तलाठ्यांना मिळणार नियुक्तीचा आदेश; आमदार निलेश लंके यांच्या मागणीची दखल

मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : जिल्ह्यात जुलै-2019मध्ये तलाठी भरतीप्रक्रिया राबविली. मात्र, त्यात निवड झालेल्या उमेदवारांना अजूनही नियुक्ती आदेश मिळाले नव्हते. याबाबत आमदार नीलेश लंके यांनी जूनमध्ये मुख्य सचिवांकडे या उमेदवारांना नियुक्‍त्या देण्याची मागणी केली होती.

त्यानुसार, राज्याचे उपसचिव डॉ. संतोष भोगले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून संशयित उमेदवारांची यादी राखून ठेवत, इतर पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याचा आदेश दिला. 

डॉ. भोसले यांनी 2 डिसेंबर रोजीच जिल्हाधिकाऱ्यांना हा आदेश पाठविला आहे. त्यानुसार, 84 पैकी पात्र उमेदवारांना नियुक्‍त्या मिळणार आहेत. जिल्ह्यातील तलाठ्याच्या 84 पदांसाठी जुलै-2019मध्ये प्रवेशपरीक्षा झाली. त्यातून डिसेंबर-2019मध्ये पात्र उमेदवारांची यादीही प्रसिद्ध झाली. मात्र, नंतर ही भरतीप्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली. त्यामुळे तिची चौकशी सुरू झाली. मात्र, त्यात अनेक पात्र उमेदवारांच्याही नेमणुका रखडल्या. ही बाब त्यांनी लंके यांच्या निदर्शनास आणून दिली. 

त्याची दखल घेत, लंके यांनी पात्र उमेदवारांना तातडीने नेमणुका देण्याची मागणी केली. त्यांच्या पत्राची दखल घेत, डॉ. भोसले यांनी ही भरतीप्रक्रिया तातडीने राबविण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought News : राज्यातील आणखी १८ तालुक्यात दुष्काळ?, पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश; सांगली जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा समावेश

IND vs WI 2nd T20I: अभिषेक शर्माला जगात भारी बनण्याची संधी; सूर्यकुमारचा वर्ल्ड रेकॉर्ड निशाण्यावर, बाबरचाही विक्रम करणार उद्ध्वस्त

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १० हजारांहून अधिक धावा; भारतात जन्मलेल्या या क्रिकेटपटूने ठोकला क्रिकेटला रामराम! पार्थिवसोबतही केलंय ओपनिंग!

Maharashtra Live News : गोवा एक्स्प्रेसमधून ५० विद्यार्थी ताब्यात

थकलेला चेहरा, डोक्यावर टक्कल, छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेच्या हिरोची ही अवस्था, तुम्ही ओळखलंत का?

SCROLL FOR NEXT