अहिल्यानगर

पाणी अंगावर उडाले म्हणून डॉक्‍टरला घरात घुसून मारहाण 

सुर्यकांत वरकड

अहमदनगर : शहरातील पाइपलाइन रस्त्यावरील गावडे मळा परिसरात पाणी अंगावर उडाले म्हणून चौघांनी जणांनी एका डॉक्‍टरला घरात घुसून मारहाण केली. ही घटना आज सकाळी घडली. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

सुवर्णा गावडे, विवेक गावडे अन्य दोन अनोळखी व्यक्तींचा आरोपींमध्ये समावेश आहे. याबाबत डॉ. अक्षयकुमार अनिल साठे (रा. साफल्य निवास कांदबरी नगरी, पाइपलाइन रोड, नगर) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की आज सकाळी घराच्या कंपाउंडमध्ये बसलो असताना वरील आरोपीपैकी एकजण त्याच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीच्या भिंतीला पाणी मारीत होता.

ते पाणी माझ्या अंगावर आले. "तुम्ही दुसरीकडे पाणी मारा' असे त्याला सांगितले. त्याला त्याचा राग आल्याने त्याने कंपाउंडमध्ये घुसून लोखंडी रॉडने मारहाण केली. अन्य आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली. 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: नेदरलँड्सला 'गुजरात'च्या कर्णधाराची मदत! भारताची कोंडी केली; शिवम-हार्दिक जोडी संकटमोचक ठरली

School Bus Strike: परीक्षांच्या तोंडावर स्कूल बस संघटनेचा संपाचा इशारा!'या' दिवशी राज्यभर सेवा ठप्प ठेवणार, मागण्या काय?

Ajit Pawar Plane Crash: ''दादाच राहिला नाही, आता खरं-खोटं करून काय उपयोग?'' सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Teacher News: महत्त्वाची बातमी! शाळेतील शिक्षकांना नियमित करणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय, वेतनश्रेणीला मंजुरी

Latest Marathi News Live Update : मुलुंड मेट्रो बांधकाम दुर्घटनेत पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT