

Aaryavir Reveals U19 Asia Cup Final Thrill to Father Virender Sehwag
Sakal
U19 Asia Cup 2026, India vs Pakistan Final: भारतीय युवा संघाने शनिवारी इतिहास घडवला. १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या चेंडूवर १ विकेट राखून विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने गेल्या दोन पराभवांचाही वचपा काढला.
या सामन्यात भारताकडून सांघिक कामगिरी पाहायला मिळाली. भारताच्या या विजयात दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागचाही (Virender Sehwag's Aaryavir Sehwag) मोलाचा वाटा होता. त्याने या सामन्यात अर्धशतक केले होते.
पाकिस्तानने भारतासमोर ३३८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानकडून उस्मान खानने १०७ धावांची खेळी केली, तर अब्दुल कादिरने ८० धावांची खेळी केली होती. कर्णधार फरहान युसफने ६३ धावांची खेळी केली. भारताकडून काव्य पटेलने ४ विकेट्स घेतल्या, तर चिगुरुपती वेंकटने ३ विकेट्स घेतल्या.