taste of drinking water 
अहिल्यानगर

अफवांवर विश्वास ठेवु नका असे कोण आणि का म्हणाले ते जाणून घ्याचं... 

गौरव साळुंखे

श्रीरामपूर (नगर) : शहरातील पिण्याच्या पाण्याची चव बद्दलली असुन यासंदर्भात समाजमाध्यमावर सध्या उलटसुलट चर्चा सुरु आहेत. यावेळी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन उशिरा सुटल्याने साठवण तलावातील पाण्याने तळ गाठला होता. पावसाळ्यात गढूळ पाणी आल्याने निर्जंतुकिकरणासाठी पावडर वापली आहे. तसेच पाण्याची नियमित तपासणी केली जाते. पाणी सोडण्यापुर्वी रोज तपासले जाते. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवु नये. असे आवाहन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले आहे.

नगराध्यक्षा अदिक यांनी याबाबत नुकतेच प्रसिध्दी पत्रक काढले आहे. पिण्याच्या पाण्याचे आवर्तन लवकर सुटण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार दोन दिवसांत पाणी सुटले पाणी सुटल्यानंतर धरणाखाली पाऊस पडल्याने पाणी गढुळ झाले . तसेच तलावाची पाणी पातळी खालावल्याने पाणी गढूळ झाले. परंतू शहरात पाणी सोडण्यापुर्वी निर्जंतुकिकरणासाठी पावडर वापरली जाते. नियमित तपासणी केली जाते. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

पावसाळ्यात पाणी उकळून आणि गाळुन प्यावे. गोंधवणी येथील आरसीसी पाणीसाठवण तलावातील पाणी वॉशआऊट करण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने तलावातील पुर्ण पाणी काढण्यासाठी अनेक दिवस लागतील. त्यात तलावाच्या तळाची फरशी निघालेली आहेत. काही ठिकाणी कागदही निघाले आहेत. त्यामुळे पुढील काळात शहरातील पाणीपुरवठा दिवसाआड केला जाण्याची शक्यता प्रसिद्धी पत्रकात वर्तविली आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: 11 हजारांनी घसरल्यानंतर सोन्याने घेतला U-Turn! ग्राहकांना मोठा झटका? जाणून घ्या आजचा ताजा भाव

Anna Hazare Praises Tukaram Mundhe : "अशा डॅशिंग अधिकाऱ्यांची देशाला गरज"; तुकाराम मुंढेंच्या 'त्या' धडक मोहिमेवर अण्णा हजारे खूश, केलं तोंडभरुन कौतुक

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्याकांत प्रकरणात सियाच्या दोन मैत्रीणींकडेही चौकशी होणार

सरकारी रुग्णालयात प्रसुती झाल्यास मिळणार सोन्याची अंगठी, राज्य सरकारचा मोठा निर्णय...

TrashBot : बारावीच्या विद्यार्थिनीने बनवला अद्भुत 'ट्रॅशबॉट' रोबो; कचरा बघताच पळत जाऊन करतोय साफसफाई, पाहून तुमचं डोकं चक्रावेल

SCROLL FOR NEXT