कुकाणे (अहमदनगर) : प्रतिदिन पन्नास हजार लिटर क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पाची उभारणी करून बी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉलनिर्मिती करणार असल्याचे भेंडे येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र घुले यांनी सांगितले.
भेंडे (ता. नेवासे) येथील 'ज्ञानेश्वर'ची 49 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (ता. 31) माजी आमदार घुले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. संचालक व माजी आमदार चंद्रशेखर घुले, सभापती डॉ. क्षितिज घुले, ऍड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, विठ्ठल लंघे, प्रा. डॉ. नारायण म्हस्के, बबनराव भुसारी, काकासाहेब शिंदे, शिवाजी कोलते, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, कामगार संचालक सुखदेव फुलारी उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर माऊली व लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
डॉ. घुले म्हणाले, साखरेच्या अतिरिक्त उत्पादनाला पर्याय म्हणून केंद्र सरकारने इथेनॉलनिर्मितीसाठी प्रोत्साहन व हमी भाव दिला आहे. सी-हेवी ऐवजी बी-हेवी मोलॅसिसपासून तयार केलेल्या इथेनॉलला जास्त भाव मिळतो. चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखाली 'ज्ञानेश्वर'कडून आजपर्यंत 12 लाख 14 हजार 855 टन उसाचे गाळप झाले. 21 लाख 74 हजार 550 क्विंटल साखर निर्माण झाली. केंद्र सरकारला साखर कारखान्यांकडून जीएसटी व एक्साईज ड्यूटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कर भरला जातो. त्यामुळे साखर कारखानदारीला बाहेर काढण्यासाठी केंद्राने साखरेचा दर 3 हजार 100 वरून 3 हजार 300 रुपये क्विंटल करावा.
बाबा आरगडे, जगन्नाथ कोरडे, अरुण गरड, सुदाम आरगडे, आप्पासाहेब वाबळे, हरिभाऊ काळे उपस्थित होते. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी ऑनलाइन संवाद साधून, उसाला प्रतिटन पंचवीसशे रुपयांच्या वर भाव मिळावा, अशी मागणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.