Dr Sujay Vikhe Allegations Funds were distributed by taking percentage politics
Dr Sujay Vikhe Allegations Funds were distributed by taking percentage politics sakal
अहमदनगर

Dr. Sujay Vikhe : टक्केवारी घेऊन निधी वाटला; डॉ. सुजय विखे

सकाळ वृत्तसेवा

राशीन : आघाडी सरकारच्या सत्तेच्या काळात पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी नगर जिल्ह्याच्या हक्काचे बावीस टीएमसी पाणी पळवले. जिल्हा परिषद अध्यक्ष, बांधकाम व समाजकल्याण सभापतींनी टक्केवारी घेऊन विकासकामासाठी निधी वाटला, असा घणाघाती आरोप खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी (ता. १३) देशमुखवाडीत (ता. कर्जत) जलजीवन मिशन नळ पाणी पुरवठा योजनेसह विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी बोलताना केला.

कार्यक्रमास भाजपचे अशोक खेडकर, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, विक्रम राजेभोसले, तालुका उपाध्यक्ष पांडुरंग भंडारे, सरचिटणीस धनंजय मोरे, सुनील काळे, दत्ता गोसावी, शहराध्यक्ष एकनाथ धोंडे, दादा सोनमाळी, तात्यासाहेब माने, सोयब काझी, संजय ढगे, शिंदे सरपंच विजय मोढळे, बंडा मोढळे, किशोर मोढळे, मधुकर दंडे, राजेंद्र मोढळे, पप्पू भाकरे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

विखे म्हणाले, की मागील तीन वर्षांत सत्तेचा वापर करून कर्जत तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना संपविण्याचे काम करण्यात आले, मात्र याबाबत कोणी बोलत नाही. नगर जिल्ह्यात ५० वर्षांच्या राजकारणात कोणीही आणि कधीही सत्तेचा वापर कार्यकर्ते आणि पक्ष संपविण्यासाठी केला नाही.

पक्षाची बाजू मांडणाऱ्यावर व्यक्तिगत स्वरूपाचे हल्ले करीत पक्षप्रवेश घडवून आणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रत्येकाला स्वच्छ पाणी मिळण्यासाठी जलजीवन मिशनची सुरवात करण्यात आली. या योजनेचा जिल्ह्यात अडीच हजार कोटींचा निधी आणला आहे. सर्वांच्या भूसंपादनाचे काम एकाच वेळेस होईल आणि सर्वांना मोबदला एकाच वेळेस मिळेल. राज्यात सरकार आल्यावर तीन महिन्यात आमदार शिंदे व मी ५० कोटींचा निधी आणला.

हिंमत आणि दानत माझीच

आमदार शिंदे म्हणाले, की जे प्रश्न राहिले आहेत ते हक्काने सांगा, ते करून दाखविण्याची हिंमत आणि दानत माझीच आहे. कुकडीच्या अस्तरीकरणाचे काम झाल्यावर पाण्यासाठी भांडत बसण्याची वेळ येणार नाही.

टक्केवारी न घेतल्याने ७० टक्के काम पूर्ण

विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी सौरऊर्जेचा वापर वाढवणे महत्त्वाचे आहे. ठेकेदाराकडून टक्केवारी न घेतल्यामुळे नगर-सोलापूर रस्त्याचे ७० टक्के काम वर्षात पूर्ण झाले. शासन आपल्या दारी या उपक्रमातून सर्वसामान्यांचे प्रश्न विनाभ्रष्टाचार मार्गी लागतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT