Due to the need of water for the crops, the rotation of the radish canal was stopped.jpg 
अहिल्यानगर

'मुळा' च्या आवर्तनाने बंधा-याला बाळसे; जलदिनानिमित्त शेतक-यांना मोठं गिफ्ट

विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : शेतीपीकाला पाण्याची गरज असताना मुळा कालव्याचे आवर्तन सुटल्याने बळीराजा मनोमन सुखावला आहे. या आवर्तनातून काही साठवण बंधारे भरुन घेतल्याने अनेक गावाचा आज जलदिनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. 

सन २०१३ ला जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आमदार असताना विविध संस्था व लोकसहभागातून तालुक्यातील साठवण बंधारे-१५५, पाझर तलाव-१८, गावतळी-२३ व साखळी बंधारे १४५ अशा एकूण ३४० बंधा-याची दुरुस्ती करुन घेतली होती. या कामातून निघालेला साडेतेरा लाख ब्रास गाळ बाराशे एकर शेतीला टाकल्याने ती शेती आता बागायती झाली. गडाखांच्या प्रयत्नातून झालेले जलसंधारणचे काम आज सर्वाना फलदायी ठरत आहे. 

सोनई, घोडेगाव, चांदे भागतील अनेक बंधारे आवर्तनातून भरुन घेतल्याने गावातील पाणीटंचाई दूर झाली आहे. घोडेगाव येथील बंधारा भरुन घेतल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. आज जलदिनानिमित्त अनेक गावाच्या बंधा-यात पाणी आल्याने सर्वत्र आनंदीआनंद व्यक्त होत आहे. विहिरी व कुपनलिकेने तळ गाठल्याने उसपीकासाठी आवर्तन महत्वाचे ठरले आहे. 

जलदिनी पाणीबचतीचा संकल्प..

मोरयाचिचोंरे येथे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व प्रतिष्ठान अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली शेतक-यांनी जलदिनाचा संकल्प म्हणून डोंगर माथ्यावर दिडशे हेक्टरसाठी 'माथा ते पायथा' समतल चर केले. १२५० हेक्टरवर बांध बंदिस्ती केली.ओढ्यावर तेरा सिमेंट बंधारे करत जलसंधारणचे मोठे काम सुरु केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT