Embezzlement of Rs. 25 lakhs in Sarole Gram Panchayat
Embezzlement of Rs. 25 lakhs in Sarole Gram Panchayat 
अहमदनगर

सारोळे ग्रामपंचायतीत २५ लाखांचा अपहार; माजी सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर ः पठार भागातील सारोळे पठार ग्रामपंचायतीत 2014 -15 ते 2017-18 या काळात सुमारे 25 लाख रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी, माजी सरपंच व तत्कालीन ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. माजी सरपंच प्रशांत गवराम फटांगरे व तत्कालीन ग्रामसेवक सुनील शेळके अशी त्यांची नावे आहेत. 

याबाबत विस्तार अधिकारी सुनील माळी यांनी फिर्याद दिली. याबाबत सुरवातीला अमित बादशहा फटांगरे यांनी तक्रार केली होती. त्यानुसार चौकशीसाठी गटविकास अधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली. समितीच्या अहवालानुसार वरील दोघांनी शासकीय निधीचा अपहार केल्याचे समोर आले.

या बाबत म्हणणे मागितले असता, सरपंचांनी ते सादर केले नाही. माजी सरपंच फटांगरे यांनी 11 लाख 72 हजार रुपये स्वतःच्या नावाने धनादेश काढून घेतले. तसेच संयुक्त जबाबदारी असलेल्या बॅंकखात्यातून काढलेल्या रकमेतील 50 टक्के रकमेलाही त्यांना जबाबदार धरले आहे.

अशा प्रकारे फटांगरे यांनी 16 लाख 13 हजार, तर ग्रामसेवकाने 9 लाख 8 हजार, असा एकूण 25 लाख 21 हजार रुपयांचा अपहार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

माजी सरपंचांनी तब्बल 82 वेळा स्वतःच्या नावाने धनादेशाने पैसे काढल्याचे समोर आले. तसा अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठविला होता. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी फिर्याद दाखल करण्याचा आदेश दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT