Money
Money e sakal
अहमदनगर

महिन्याला लाखो कमवायचेत? या शेतकऱ्यांची शेती पहा

संजय आ. काटे

श्रीगोंदे : शेती परवडत नाही, असे म्हणणाऱ्यांना माठ (ता. श्रीगोंदे) येथील राजेंद्र न संजय घेगडे या बंधूंच्या शेतीतून चपराक बसते. शेती कशी करायची याचे प्रात्यक्षिकच त्यांच्याकडे बघायला मिळते. आधुनिक शेतीला नियोजनाची जोड दिल्याने दहा एकर शेतीतून ते वर्षाकाठी अठरा लाखापर्यंत जात असले तरी महिन्याला दोन लाखाचे उत्पन्न कसे मिळेल, याचा प्रयोग ते करीत आहेत.

माठ येथील माजी सरपंच गुलाबराव घेगडे यांनी सुरु केलेली शेतीतील प्रयोग त्यांचे दोन मुले राजेंद्र व संजय पुढे चालवित आहेत. हे दोन्ही बंधू शाळेत दहावीत भलेही नापास झाले. मात्र, त्यांनी शेतीतून नोकरदाराला लाजवेल, असे प्रयोग करीत महिन्याचा पगार येईल असे नियोजन केले आहे. (Farmers in Shrigonda earn Rs 18 lakh a year)

असे आहे शेती नियोजन

शेतात ते मिश्र पीक पद्धतीने तिमाही, सहामाही, नऊमाही, बारामाही या चार गटांमध्ये पीक लागवड करतात. सगळ्या शेतात ठिबक सिंचन, हवामान यंत्र, शेडनेट, गांडूळखत प्रकल्प, बगीचा असे वेगळे प्रकारचे प्रयोग करीत तेथे आधुनिक शेतीचा उत्तम नमुना त्यांच्या शेतीत बघायला मिळतो. कोणत्या पिकावर कधी फवारणी करायची, किती पाणी द्यायचे, आज खत औषधी देणे योग्य आहे की नाही हे बघण्यासाठी त्यांनी हवामान यंत्र देखील शेतात बसवले आहे. त्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज त्यांना येतो आणि त्यानुसार ते कधी कोणते औषध आणि खत, पाणी देणे योग्य असेल याचे व्यवस्थापन करतात.

राजेंद्र घेगडे म्हणाले, शेतीकडे व्यवसायिक दृष्टीकोनातून बघतो. त्यावेळी पूर्ण काळजी घ्यावी लागते. हवामान यंत्राचा पाणी, खत, फवारणी व्यवस्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होतो. योग्य व्यवस्थापन आणि शेतीची असलेली अचूक माहिती याचा वापर करून ते आज १० एकर क्षेत्रामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होते. मिश्र शेती पीक पद्धतीने ते बाराही महिने नफा मिळवतो. सध्या उसाचा सहावा खोडवा असून त्याचे उत्पादन एकरी पन्नास टनापर्यंत निघेल.

यात प्रत्येकवर्षी अंतरपीक घेतो, यावर्षी मूग पेरणी केली होती. प्रत्येक भाजीपाला, फळबागा यावर भर देतो. शेतीच्या उत्पन्नातूनच साठ लाखाचा बंगला बांधला आहे. व्यावसायिक शेती केली तर त्यातून चांगले उत्पन्न मिळते.

घेगडे यांनी तिमाही पाल्याभाज्या या पिकाची लागवड करतात. दोडके, टोमॅटो, काकडी, शिमला मिर्ची, दोडका, भेंडी यासारख्या भाज्यांचे पीक घेवून त्यातून नफा देखील मिळवतात.

वर्षातून दोन वेळा ही पिके घेतली जातात. त्यासाठी ते जमिनीचा बदल करतात. क्षेत्र बदलून घेतल्याने माल चांगल्या प्रतीचा येतो आणि उत्पादनात देखील वाढ बघायला मिळते, असे ते सांगतात. या सगळ्या कामात त्यांना कृषी विभागाची मोठी मदत होते. गावातील कृषी सहायक अनिल पाचपुते, तालुका कृषी अधिकारी पदनाभम म्हस्के यांचे मार्गदर्शन मिळते.

शेतकऱ्याचे कार्यालयही

घेगडे हे व्यावसायिक शेती करतात. त्यामुळे शेतीत खर्च किती झाला, किती नफा मिळाला या सर्व गोष्टींचा लेखाजोखा ठेवण्यासाठी शेती कार्यालयदेखील उघडले आहे. शेतकऱ्याने असे कार्यालय क्वचितच दिसते. त्यांनी याला शेतकरी कार्यालय असे नावदेखील दिले आहे. (Farmers in Shrigonda earn Rs 18 lakh a year)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

Latest Marathi News Live Update : मुंबई स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT