Farmers of Shrirampur harassed due to burglary 
अहिल्यानगर

भुरट्या चोऱ्यांमुळे श्रीरामपूरचे शेतकरी हैराण

गौरव साळुंके

श्रीरामपूर ः वीजपंपांसह तुषार संचांच्या चोरीचे प्रमाण वाढल्याने तालुक्‍यातील गोंधवणी परिसरासह अनेक भागांतील शेतकरी त्रस्त आहेत. गोंधवणी ग्रामस्थांसह परिसरातील शेतकऱ्यांनी काल (शुक्रवारी) शहर पोलिस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. 

शेतांमधून विविध साहित्याची चोरी होत असल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यात अनेकदा करूनही, चोरट्यांविरुद्ध कुठलीही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात लहान-मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

चोरट्यांनी काल रात्री बाराच्या सुमारास परिसरातील प्रवीण फरगडे यांच्या विहिरीतील वीजपंप चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, विहिरीत टाकलेला वायररोप फरगडे यांच्या सतर्कतेमुळे तसाच सोडून चोरटे पसार झाले. यापूर्वी विहिरीमधील वीजपंप चोरीला गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

पोलिसांनी शोध घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी गोंधवणी ग्रामस्थांनी निवेदनात केली आहे. चोऱ्या न थांबल्यास शेतकरी गोठ्यातील जनावरे पोलिस ठाण्यासमोर आणून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा प्रवीण फरगडे, दत्तात्रय कांदे, प्रमोद फरगडे, नितीन फरगडे, विजय मोरगे, गोविंद कांदे, संदीप वहाडणे, विष्णू मोढे यांनी दिला आहे. 

दरम्यान, शेतातील साहित्याच्या चोरीच्या घटना रोखण्याच्या मागणीची निवेदने गृहमंत्री अनिल देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील यांना पाठविण्यात आली आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : विनायक चतुर्थीनिमित्त अन्नदान कार्यक्रमात दुर्दैवी अपघात; गरम सांबारच्या भांड्यात पडून महिलेचा मृत्यू,थरकाप उडवणारा व्हिडिओ

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

SCROLL FOR NEXT