Farmers suffer from power outages esakal
अहिल्यानगर

ऐन पिकांना पाणी देण्याच्या वेळीच विजेचा खेळखंडोबा; शेतकरी त्रस्त

सकाळ वृत्त सेवा

पारनेर (जि. अहमदनगर) : तालुक्यात सध्या विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. त्यामुळे शेतकरी त्रासले आहेत. सध्या शेतीपंपांसाठी फक्त सहा तास वीज दिली जाते, तीही पूर्ण दाबाने मिळत नाही. अनेकदा ती गायबही होते. आम्हाला किमान आठ तास तरी वीज मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

बिबट्यांच्या भीतीने रात्री पाणी देता येईना

यंदा पाऊस काही भागात समाधानकारक, तर काही भागात कमी झाला आहे. मात्र, सगळीकडे कमी-अधिक प्रमाणात विहिरी- तलावांना पाणी आहे. पिकेही चांगली आहेत. मात्र, विजेअभावी ती सुकू लागली आहेत. विहिरी- तलावांत पाणी आहे, मात्र केवळ विजेअभावी पिकांना देता येत नाही. शेतकऱ्यांना वीजवितरण कंपनी २४ तासांचे बिल देते, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फक्त सहाच तास वीज मिळत असल्याने नाराजी आहे.
तालुक्यात अनेक भागांत रात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन होते. महावितरण मात्र आठ दिवस दिवसा, तर आठ दिवस रात्री वीजपुरवठा करते. त्यामुळे रात्रीच्या वेळी वीज मिळत असूनही अनेक गावांत शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी जाता येत नाही.

ऊर्जा राज्यमंत्री जिल्ह्यातील असल्याने, किमान नगर जिल्ह्यात वीजपुरवठा सुरळीत होईल, अशी किमान अपेक्षा जिल्ह्यातील जनतेची आहे. मात्र, ऐन सणासुदीच्या व पिकांना पाणी देण्याच्या वेळीच शेतीपंपांसह घरगुती विजेचा तालुक्यात खेळखंडोबा सुरू आहे.

''शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने, तसेच किमान आठ तास वीज व तीही दिवसा दिली नाही, तर आम्ही एक रुपयाही वीजबिल भरणार नाही. दिवाळीनंतर वीजवितरण कंपनी वीजबिल वसुली सुरू करणार आहे. ती आम्हाला मान्य नाही.'' - अनिल देठे, शेतकरी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

Konkan Railway : बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात कधी जायचंय? रेल्वे आरक्षणाचे संपूर्ण वेळापत्रक आले समोर, एका क्लिकवर पहा

आधी 'हनिमून'साठी सजावट, आता चक्क 'पुजा-अर्चा'; रेल्वेच्या डब्यांमध्ये नेमकं चाललंय तरी काय? VIDEO समोर...

Latest Marathi News Live Update : मृत वारकऱ्यांच्या नातेवाईकांना चार लाखाची मदत; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

Video : जगातला अनोखा विवाहसोहळा! दोन रोबोट्सनी केलं लग्न; खऱ्या वधू-वराप्रमाणे बांधली सात जन्माची गाठ, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

SCROLL FOR NEXT