Indian Railways Saloon Car Puja Video Goes Viral
esakal
Indian Railway Viral Video: काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या एका कोचची हनिमूनसाठी सजावट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या प्रकरणात संबंधित टीसीवर कारवाई करत त्याला निलंबित करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा रेल्वेतील आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये धावत्या रेल्वेत पूजा-अर्चा सुरू असल्याचे दिसत असून, त्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. रेल्वेत अशा प्रकारचे धार्मिक विधी करण्यास परवानगी असते का, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे.