mula dam overflwo 
अहिल्यानगर

पुणे, नाशिकमधील नद्यांना पूर...नगरमधील नदीकाठाला इशारा

अमित आवारी

नगर ः जिल्ह्यात आठवडाभरापासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यांना पूर आले आहेत. प्रवरा, गोदावरी, भीमा, सीना नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कधी नव्हे ते सीना धरणही यंदा ओव्हर फ्लो झाले आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पत्रकात म्हटले आहे, की नाशिक जिल्ह्यातील नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून 19 हजार 490 क्‍यूसेकने आज सकाळी 10 वाजता गोदावरी नदीत विसर्ग सोडला आहे. भीमा नदीतून दौंड येथील पुलाखालून 29 हजार 465 क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

भंडारदरा धरणातून प्रवरा नदीत 3268 क्‍यूसेक विसर्ग सुरू आहे. सीना धरणातून नदीत 20 क्‍यूसेक विसर्ग सुरू आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीतील विसर्गातही वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

आगामी काळात नगर, नाशिक व पुणे जिल्ह्यांत पावसामुळे वा धरणातून सोडलेल्या विसर्गात वाढ झाल्यास प्रवरा, गोदावरी, भीमा, सीना या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्‍यता आहे. नागरिकांनी सूचनांचे पालन करावे. सखल भागातील नागरिकांनी तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे.

पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपासून, तसेच ओढे-नाल्यांपासून दूर राहावे. सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे- नाल्यांवरील पुलांवरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नयेत. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. जुनाट अथवा मोडकळीस आलेल्या वा धोकादायक इमारतीत आश्रय घेऊ नये. 
अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्‍यता असते. त्या दृष्टीने डोंगरांच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी. वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.

घाटरस्त्याने प्रवास करणे शक्‍यतो टाळावे. धरण व नदी क्षेत्रात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या प्रवाहात उतरू नये. नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाल्यास जीवितास धोका उद्‌भवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नयेत, अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत. 

आपत्ती काळात संपर्क 
आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस ठाण्यांशी संपर्क साधावा. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांक 1077 (टोल फ्री), 02412323844 अथवा 2356940. 

धरणांची टक्‍केवारी 
भंडारदरा - 93.72 
मुळा - 68.22 
निळवंडे - 73.63 
आढळा - 67.26 
मांडओहोळ - 86.19 
घाटशीळ पारगाव - 21.72 
सीना - 100 
खैरी - 69.98 
विसापूर - 24.85 

आणखी दोन दिवस पाऊस 
भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात उद्या (सोमवारी) व मंगळवारी (ता. 18) पाऊस राहणार असल्याचा इशारा दिला आहे. दोन्ही दिवस दमदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vodafone Idea AGR dues : वोडाफोन-आयडियाला सरकारचा दिलासा, तरीही शेअर्स कोसळले!₹87,695 कोटींच्या AGR ला मुदतवाढ; नेमकं काय घडलं?

Zomato Swiggy Latest News : ‘गिग वर्कर्स’च्या संपासमोर ‘झोमॅटो-स्विगी’ झुकले! ‘ डिलिव्हरी पार्टनर्स’चा पगार वाढला

Dilip Walse Patil : 'अवसरी खुर्द शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ११० कोटींचे अत्याधुनिक कौशल्य विकास केंद्र उभारणार' – माजी गृहमंत्री वळसे पाटील!

Nanded News : नववर्ष २०२६ स्वागतासाठी शिस्त आणि सुरक्षिततेचे आवाहन; सिंदखेड पोलीस सक्रिय!

BMC Election: मुंबई महापालिकेसाठी वळणाचे वर्ष! निवडणूक रणशिंग, राजकीय समीकरणांची उलथापालथ आणि विकासकामांचा वेग

SCROLL FOR NEXT