Former MLA of Shrirampur Bhausaheb Kamble is also a corona patient 
अहिल्यानगर

श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळेही कोरोना बाधित

गौरव साळुंके

श्रीरामपूर: येथील माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांना मागील काही दिवसांपासून त्रास होत असल्याने त्यांनी काल रॅपीड तपासणी केली. त्यात ते कोरोना पाॅजिटिव्ह आढळून आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.

येथील संत लुक रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. त्यांना त्रास होत असल्याने त्यांनी फॅमिली डॉक्टरांकडून औषधोपचार घेतला. परंतू प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांनी अखेर काल ग्रामीण रुग्णालयात जाऊन रॅपीड तपासणी केली. त्यात यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

त्यांना तातडीने संत लुक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आरोग्य विभागाने आज आमदार कांबळे यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा मंदाताई कांबळे यांचीही कोरोना तपासणी केली. त्यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याचे कळाले. 

खबरदारी म्हणून आमदार कांबळे यांचे चिरंजीव नगरसेवक संतोष कांबळे, संदीप कांबळे यांचीही तपासणी केली असता ते सर्वजण निगेटिव्ह आले आहेत. येथील संत लुक रुग्णालयात सध्या अॅक्टीव रुग्णांवर उपचार सुरु आहे. दरम्यान, येथील अशोक सहकारी साखर कारखाना येथील एका अधिकाऱ्याच्या कोरोनामुळे नगर येथे आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.

माझी प्रकृती उत्तम आहे. येथे मिळत असलेल्या उपचार व सुविधांबाबत मी समाधानी आहे. नागरिकांनी प्रशासकीय नियमांचे पालन करुन काळजी घ्यावी.

- भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार, श्रीरामपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

आजचे राशिभविष्य - 17 सप्टेंबर 2026

Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

SCROLL FOR NEXT