Former Vice Chancellor Dr. Subhash Puri said there are many research challenges facing agronomists 
अहिल्यानगर

कृषीशास्त्रज्ञांपुढे अनेक संशोधनात्मक आव्हाने : माजी कुलगुरु डॉ. सुभाष पुरी

रहिमान शेख

राहुरी (अहमदनगर) : केंद्र सरकारच्या धोरणानुसार पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य विनियोग करून एकात्मिक सेंद्रीय शेती संशोधन, जागतिक तापमानवाढीस तग धरणाऱ्या पिकांवरील संशोधनावर लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुभाष पुरी यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात मागोवा-२०२० या ऑनलाईन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य, विद्यापीठाचे संचालक, अधिकारी, शास्त्रज्ञ मोठया संख्येने उपस्थित होते.

डॉ. पुरी म्हणाले, मूळ विस्तार कार्याची जबाबदारी असलेला राज्याचा कृषी विभाग हा शेतकऱ्यांच्या विस्तार कार्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर त्यांची मदार दिसून येते. विद्यापीठातील रिक्त पदांची टक्केवारी पाहता शिक्षण, विस्तार व संशोधन कार्य विद्यापीठांना कसे शक्य होईल याकडे राज्यकर्त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. कृषी विज्ञान केंद्रे ही योग्य कार्य करताना दिसत नाहीत. डॉ. पुरी यांनी खाजगी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुमार दर्जाकडे तसेच देशपातळीवर घसरलेल्या मानांकनाकडे त्यांनी लक्ष वेधले.

यावेळी संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांनी गतवर्षाचा संशोधन व विस्तार शिक्षण आढावा, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे यांनी शिक्षण, कुलसचिव मोहन वाघ यांनी प्रशासन, नियंत्रक विजय कोते यांनी वित्त विभागाचा व अभियंता मिलिंद ढोके बांधकाम विभागाचा अहवाल सादर केला. या ऑनलाईन कार्यक्रमाला विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख, सहयोगी संशोधन संचालक, पीक विशेषज्ञ, संशोधन केंद्रांचे व योजनांचे प्रमुख, शास्त्रज्ञ, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भगवान देशमुख यांनी केले तर डॉ. पंडित खर्डे यांनी आभार मानले.

विद्यापीठाचा फुले ब्रँड विकसित करणार : कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील 

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विद्यापीठाची महत्वाची भूमिका असून सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करून विद्यापीठाचे संशोधन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी योजना आखल्या जातील. शेतकऱ्यांनी एकत्र येवून शेती करणे काळाची गरज बनली आहे. मागोवा कार्यक्रमासोबत आता वेध भविष्याचा हा आगामी वाटचालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करणे गरजेचे आहे.

या ऑनलाईन कार्यक्रमात विद्यापीठाचे लोकप्रिय प्रकाशन ‘कृषिदर्शनी २०२१‘ चे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. शेतकऱ्यांना लवकरच ही कृषिदर्शनी विक्रीसाठी उपलब्ध होईल असे प्रभारी अधिकारी डॉ. पंडित खर्डे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT