Ahmednagar News
Ahmednagar News  sakal
अहमदनगर

Ahmednagar News : वीज पडून चार जनावरांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

जामखेड : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच दि १७ एप्रिल रोजी सायंकाळी जामखेड तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे चार जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. याबाबत तहसीलदार गणेश माळी यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

बुधवारी (ता.१७) झालेल्या वादळी वा-यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जामखेड तालुक्यातील अनेक भागात बुधवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान, वीज पडून जनावरे मृत्यू होण्याच्या घटना तालुक्यातील चार ठिकाणी झाल्या. दोन दिवसांपूर्वी साकत येथे पांडुरंग वराट यांचा बैल वीज पडून मृत्यू झाला होता.

तर बुधवारी (ता.१७) झालेल्या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील कुसडगाव येथील बिभीषण रामचंद्र भोरे यांची गाय, जवळके येथील अंकुश वाळुंजकर यांची गाय, दादासाहेब हाडोळे यांचा बैल तर भुतवडा येथील उद्धव पांडुरंग डोके यांचे एक वासरू वीज पडून मृत्यू पावले आहेत.

दोन गायी, एक बैल व एक वासरासह फळ पिकांचेही काही भागात नुकसान झाले आहे. विजेच्या कडकडाटांमुळे जामखेड शहरातील वीज पाच ते सहा तासांपासून बंद होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात अर्ध्यातासापासून ईव्हीएम बंद

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT