Free school admission will start from this date 
अहिल्यानगर

या तारखेपासून सुरू होणार मोफत शाळा प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

नगर : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिक व दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी प्रवेशप्रक्रिया यंदा शाळा स्तरावरच राबविली जाणार आहे. त्यानुसार बुधवारपासून (ता. 24) प्रवेशप्रक्रियेला सुरवात होणार आहे. 

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009नुसार खासगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर 25 टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी "आरटीई'अंतर्गत 25 टक्के प्रवेशांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले.

जिल्ह्यातील 396 शाळांमध्ये सात हजार 65 जणांनी अर्ज दाखल केले असून, त्यामध्ये 3541 जणांची निवड केली जाणार आहे. 17 मार्च रोजी सोडत काढण्यात आलेली आहे. त्याद्वारे जिल्ह्यातील 3383 विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. याबाबत विद्यार्थ्यांना संदेश पाठविण्यात आले आहेत.

लॉकडाउनमुळे पुढील प्रवेशप्रक्रियेचे कामकाज झालेले नाही. सध्याच्या परिस्थितीत पडताळणी केंद्रावर समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे फक्त या शैक्षणिक वर्षासाठी शाळा स्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी करून पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश देण्यात येणार आहेत. त्यासाठी बुधवारपासून (ता. 24) प्रवेशप्रक्रियेला सुरवात होणार आहे, असे जिल्हा परिषदेतील प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी सांगितले. शाळा स्तरावर टप्प्याटप्प्याने पालकांना बोलविण्यात येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

Ratnagiri : देव तारी त्याला कोण मारी! पुण्यातील पर्यटक समुद्रात वाहून जात होता..., स्थानिकांनी प्रसंगावधानामुळे वाचला; थरारक क्षण

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT