corona 19 
अहिल्यानगर

गुड न्युज : नगरचे 28 रुग्ण कोरोना मुक्त

सकाळ वृत्तसेवा

नगर :  कोरोना बाधित असलेल्या नेवासा येथील एक आणि जामखेड येथील दोघा रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या आता 28 झाली आहे. एकूण 44 कोरोना बाधित रुग्णांपैकी 14 रुग्ण उपचार घेत असून दोन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 
 
जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेले या व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. नेवासा येथील व्यक्ती कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याला रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. मात्र 14 दिवसानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव आल्याने त्याच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर सात दिवसांनी त्याचे अहवाल घेण्यात आले हे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला. तसेच जामखेड येथील दोन्ही व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला.

हे दोन्ही रुग्ण जामखेड येथील कोरोना बाधित मृत व्यक्तीचे मुलगे आहेत. त्यांचे 14 दिवसांनंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. मात्र जामखेड हॉटस्पॉट क्षेत्र घोषित करण्यात आले असल्याने त्यांना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 44 असून त्यापैकी आता 28 रुग्ण कोरोना मुक्त होऊन परतले आहेत.

दरम्यान जिल्ह्यातील प्रलंबित तेवीस व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत आणखी 18 व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयाने आतापर्यत १६४४ व्यक्तींचे स्त्राव तपासणी केली असून त्यापैकी १५५५ जणांचे अहवाल निगेटीव आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Tank Tower: मोठी घटना! नागपुरात पाण्याच्या टाकीचा टॉवर कोसळला; ३ जणांचा मृत्यू, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले

Winter Weather Forecast : उत्तर भारतातील थंड हवेची लाट पुन्हा वाढली, अजून गारठा वाढणार; हवामान विभागाचा अंदाज

SSC CGL Tier 1 Result 2025: SSC CGL टियर 1 परीक्षा 2025 चा निकाल जाहीर; पहा कुठे अन् कसा पाहायचा रिजल्ट

Latest Marathi News Live Update : मुंबई नाशिक महामार्गावर बाईक अपघात, पती-पत्नीचा जागीच मृत्यू

भारताची जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू स्पर्धेत खेळला; फोटो, व्हिडीओ व्हायरल होताच पाकड्यांचा संताप, खेळाडूवर कठोर कारवाई

SCROLL FOR NEXT