Green signal to cargo transport with passengers from Shirdi Airport 
अहिल्यानगर

शिर्डी विमानतळावरून प्रवाशांसह कार्गो वाहतुकीस ग्रीन सिग्नल

सतीश वैजापूरकर

पोहेगाव : शिर्डी विमानतळावरून प्रवाशांसह कार्गो वाहतुकीसाठीही नागरी उड्डयन सुरक्षा ब्यूरो कार्यालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच शिर्डी विमानतळावरून कार्गो वाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळे स्थानिक मालास व वाहतुकीस चालना मिळेल.

हवाई वाहतुकीमुळे वेळेची बचत होईल. लवकरच शिर्डी विमानतळ मर्यादित मालवाहतूक सेवा सुरू करणार असून, त्यासाठी आवश्‍यक उपकरणे बसविण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री यांनी दिली. 

शिर्डी विमानतळ प्रशासनाने कार्गो वाहतुकीसाठी नागरी उड्डयन सुरक्षा ब्यूरोकडे परवानगी मागितली होती. त्यांच्या परवानगीचे पत्र नुकतेच शिर्डी विमानतळ प्रशासनास मिळाले. सध्या प्रवाशी वाहतूक करणाऱ्या विमानांतूनच मालवाहतूक होणार आहे. त्यास मिळणाऱ्या प्रतिसादावर पुढील निर्णय होणार आहे. येथून मालवाहतूक सुरू झाल्यास काकडीसह परिसरात रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. 

शिर्डी विमानतळावरील "नाईट लॅंडिंग'चे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. त्यास तांत्रिक मंजुरी मिळण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने नागरी उड्डाण संचालनालयाकडे (डीजीसीए) पाठविला आहे. त्यांचे पथक लवकरच काकडीत येऊन कामाची पाहणी करणार आहेत. त्यांच्या मंजुरीनंतर येथे रात्रीची विमानसेवा सुरू होणार आहे. येत्या दीड महिन्यात मंजुरी मिळून येथे ही सेवा सुरू होऊ शकते. रन-वे, दिवे व इतर आवश्‍यक सुविधांची कामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दीपक शास्त्री यांनी दिली. 

"गो-एअर'ची सेवा सुरू होणार 
दरम्यान, सध्या "इंडिगो' आणि "स्पाईस जेट' या कंपन्या येथे विमानसेवा देत आहेत. सध्या रोज 10 विमाने येथून ये-जा करतात. आता 27 तारखेपासून "गो-एअर' कंपनी येथून विमानसेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्यांनी डीजीसीए व महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडे परवानगी मागितली आहे. त्यांची परवानगी मिळाल्यावर दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, मुंबई व चेन्नईसाठी येथून विमानसेवा सुरू करणार आहेत. त्यामुळे येथून तीन कंपन्यांची 15 विमाने ये-जा करतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT